अपहरण करून खंडणी मागणाऱ्या फरार खंडणी खोरांना अटक : गोंदिया पोलिसांची कामगिरी


गोंदिया, दिनांक : 10  नोहेंबर 2022  :  पो.स्टे. गोंदिया ग्रामीण हद्दीतील सेलटॅक्स कॉलनी, फुलचुर पेठ येथे फिर्यादी नामे – गौरव संतोष बेदरे रा. भानेगाव, ता. लांजी जिल्हा- बालाघाट यांचे लहान भाऊ व त्याचे इतर चार मित्र यांना त्यांचे राहत असलेल्या रूम मध्ये मारपीट करून फिर्यादी चे वडीलांना 5 लाख रुपयाची मागणी करून नाही दिल्यास तुमच्या मुलास ठार करू अशी फोन वरून भीती घालून फिर्यादी चे वडीलांकडून 5 लाख रुपये घेवून गेल्याने पळून जाणाऱ्या अज्ञात आरोपितांविरुध्द पो.स्टे. गोंदिया ग्रामीण येथे ( दि. 05 नोहेंबर रोजी ) फिर्यादी चे तक्रारी वरून गु.र. न. 468/2022 कलम 364 (अ), 386,452, 342, 327, 323, भादंवि अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

सदर गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधिक्षक गोंदिया निखिल पिंगळे यांनी गुन्हा करून फरार झालेल्या अज्ञात आरोपितांचा शोध घेवून त्यांना तात्काळ अटक करण्या बाबत निर्देश दिल्याने, तसेच अप्पर पोलीस अधीक्षक अशोक बनकर, यांनी आदेशित केल्याने उपविभागीय पोलीस अधिकारी, गोंदिया सुनील ताजने, स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नी. आव्हाड यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठांचे वरील निर्देश व आदेशानुसार फरार आरोपींचे शोध घेवून त्यांना तात्काळ अटक करण्याकरिता पोलिस स्टेशन व स्था. गु. शा. चे वेगवेगळी पथके नेमून त्यांना आवश्यक सूचना व मार्गदर्शन करून रवाना करण्यात आले.

दिनांक 08/11/2022 रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक सदर गुन्ह्यातील अज्ञात फरार आरोपींचा शोध घेत असताना गोपनीय बातमीदार व तांत्रिक विश्लेषण वरून गुन्हा करून पळून गेलेले आरोपी हे कपिल नगर नागपूर येथे असल्याची खात्रीलायक माहिती मिळाल्याने त्यांना अत्यंत कौशलयाने, व शिताफीने, ताब्यात घेण्यात आले. १) प्रकाश ऊर्फ पप्पु हनसलाल टेंभरे वय २८ वर्ष रा. दत्त मंदीरा च्या माघे, छोटा गोंदिया, ता. जि. गोंदिया,  २) धम्मदिप उर्फ दिप मोहनलाल वासनिक वय-३२ वर्ष रा. परसटोली, छोटा गोंदिया, ता. जि. गोंदिया

३) चंद्रशेखर उर्फ चिंटु मधुकर साठवणे वय २७ वर्ष रा. हनुमान मंदिर जवळ, छोटा गोंदिया, ता. जि. गोंदिया.,  ४) गगन तेजराम भगत वय- २४ वर्ष रा. दत्तमंदीराच्या माघे, जितेश चौक, छोटा गोंदिया, ता.जि. गोंदिया., वर नमुद आरोपीत इसमांना गुन्ह्याबाबत विचारपुस केली असता आरोपी क्र. ०१ ते ०४ यांनी सदर गुन्हा केला असल्याची कबुली दिल्याने नमुद आरोपीत इसमांना ताब्यात घेवून अटक करीत असल्याबाबतची माहीती आरोपी क्र. ०१ यांचे वडील हनसलाल टेंभरे यांना फोन व्दारे देण्यात आली. व आरोपींना गोंदिया येथे आणून गोंदिया ग्रामीण पोलिस यांचे स्वाधीन करण्यात आले.

गुन्ह्याचा पुढील तपास पो.नि पो.स्टे. गोंदिया ग्रामीण चे प्रभारी अजय भुसारी यांचे मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरीक्षक आसाराम चव्हाण हे करीत आहेत. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक, गोंदिया निखिल पिंगळे यांचे निर्देशान्वये अपर पोलीस अधीक्षक अशोक बनकर, उपविभागीय पोलीस अधिकारी, गोंदिया सुनील ताजने यांचे व स्था.गु.शा. चे पो.नि. बबन आव्हाड यांचे मार्गदर्शनात, व नेतृत्वात स्था.गु.शा. चे पथकातील पो. उप. नि. विघ्ने, पो. हवा. विठ्ठल ठाकरे, पो. शि. विजय मानकर, संतोष केदार, चापोशी मुरली पांडे, व तांत्रिक सायबर शाखेचे सपोनी. महादेव शिद, यांची टीम पो. हवा. दीक्षित दमाहे, धनंजय शेंडे, यांनी केली आहे.


 

Leave a Comment