तो बिबट अखेर झाला जेरबंद


सडक अर्जुनी, गोंदिया, दिनांक : १५ ऑक्टोंबर २०२२ : जिल्ह्याच्या सड़क अर्जुनी तालुक्याच्या कोसबी गावात धुमाकुळ घालणाऱ्या  बिबटयाला अखेर जेरबंद करण्यास यश आले आहे. मागील महिन्याभरापासून अनेक पशुपालकांच्या गाय, बकरी, कोंबड़याला फस्त केल्यावर त्याला जेरबंद करण्याची मागणी केली जात होती. अखेर १३ ऑक्टोंबर रोजी च्या रात्रि ०७ वाजता बिबटयाला जेरबंद करण्यास वनविभागाला यश मिळाले आहे.

बिबटयाला जेरबंद केल्याने गावकऱ्यानी सुटकेचा श्वास घेतला आहे. या बिबट्याला गावापासून लांब वनविभागाच्या जागेत नेऊन सोडण्यात आले आहे. गावाकडे वन्य प्राण्यांचा कल आहे. तालुका वन संपदेने नटलेला आहे. राखीव वन क्षेत्र गावालात अश्ल्याने वन्य जीवांची गावाकडे वाटचाल काही थांबणार नाही. शिकारीच्या शोधात वन्यजीव सर्वत्र फिरत असतात. यावर कायमची उपाय यौजना करण्याची आवश्यकता आहे.


 

Leave a Comment