गोंदिया, दिनांक : १६ जून २०२२ : सडक अर्जुनी तालुक्यातील पळसंगाव, मुरपार/राम ग्रामपंचायत अंतर्गत महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून विविध विकासकामांचे भूमिपूजन माजी मंत्री राजकुमार बडोले यांच्या हस्ते पार संपन्न झाले.
१) मौजा माताटोली येथे सिमेंट रस्ता बांधकाम रु.०५ लक्ष, २) मौजा आखरटोली सिमेंट रस्ता बांधकाम रु.१० लक्ष, ३) मौजे मुडरीटोला येथे सिमेंट नाली बांधकाम रु.०५ लाख, ४) मौजा मुरपार/राम येथे पांदन खडीकरण रस्ता बांधकाम रु.१५ लक्ष. या कामांचे भुमीपूज करण्यात आले.
या कार्यक्रमात गावाच्या विकासासाठी संघटीतपणे काम करणाऱ्या ग्रामपंचायतीतील सदस्य, ग्रामस्थ यांचे कौतुक केले. गावाच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वोतोपरी सहकार्य करण्याचे माझा प्रयत्न राहील असे माजी मंत्री राजकुमार बडोले यांनी सांगीतले.
यावेळी पंचायत समितीचे उपसभापती शालिंदर कापगते, जिल्हा परिषद सदस्य डॉ. भुमेश्वर पटले, कविता रंगारी, निशा तोडासे, पं.स. सदस्य चेतन वळगाये, पळसंगावचे सरपंच हिरालाल चवारे, मुरपारचे संरपच व्यंकट चौधरी, हरिचंद लांजेवार, देवलाल कटरे, भुमेश्वर वैद्ये, विनोद बारसागडे, कुलदीप पांडे यांच्यासह ग्राम पंचायत सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.