लोहारा, दि. 11 जानेवारी : डॉ. बाबासाहेब आंबेडकर कला. वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय सुरतोली /लोहारा ता. देवरी येथील ग्रंथालयात वाचन संकल्प महाराष्ट्राचा या उपक्रमाअंतर्गत दि. 1 ते 15 जानेवारी या कालावधीत वाचन संकल्प पंदरवाड्याचे आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यक्रम संस्था सचिव राजकुमार मळामे तसेच संस्था सदस्य विक्रांत मळामे यांच्या उपासस्थितीत महाविद्यालयीन ग्रंथालयात. ग्रंथाप्रदशनी, ग्रंथालय स्वच्छता, सामूहिक वाचन, ई, उपक्रम ग्रंथपाल प्रा. तुषार गेडाम यांनी दि. 09 जानेवारी रोजी ग्रंथालयात राबविले.
सदर उपक्रमाचा विद्यार्थि वाचक आणि महाविद्यालय प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्यासाठी उपयोगी ठरले सदर कार्यक्रमाला विध्यार्थीयांनी भरपूर प्रतिसाद दिला. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील प्रा. सुयोग गजभिये, प्रा. किशोर मेंढे, प्रा. प्रभाकर भैसारे, प्रा. मनोज हेमने, प्रा. वसंत साखरे, प्रा. हरीणखेडे, प्रा. कोल्हे, प्रा. दडमल मॅडम, प्रा. मरस्कोल्हे मॅडम तसेच शिक्षकेतर कर्मचारी विलास नंदेश्वर, शुभम डोंगरे, यांनी कार्यक्रमात आपला सहभाग दिला.