प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर यंत्रणांनी समन्वयाने काम करावे : उप.जि. भैय्यासाहेब बेहेरे

गोंदिया, दि. 11 जानेवारी ( जी.मा.का. ) : प्रजासत्ताक दिनाच्या 75 व्या वर्धापन दिनानिमीत्त 26 जानेवारी रोजी सकाळी 9.15 वाजता ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय कार्यक्रम पोलीस मुख्यालय मैदान कारंजा, गोंदिया येथे साजरा होणार आहे. त्यादृष्टीने सोपवलेली जबाबदारी यशस्वीपणे पार पाडण्यासाठी यंत्रणांनी समन्वयाने काम करावे, अशा सूचना 09 जानेवारी रोजी निवासी उपजिल्हाधिकारी भैय्यासाहेब बेहेरे यांनी दिल्या.

येत्या 26 जानेवारी रोजी साजरा होणाऱ्या प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमासंदर्भात पुर्व नियोजन करण्याकरीता जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात पुर्वतयारी आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती, त्यावेळी ते बोलत होते.

सभेला सार्वजनिक बांधकाम (क्र.2) विभागाचे कार्यकारी अभियंता एस.डी.उसेंडी, सा.बां. क्र.1 चे उपविभागीय अभियंता प्रकाश लांजेवार, राखीव पोलीस निरीक्षक रमेश चाकाटे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी राजेंद्र केसकर, आगार व्यवस्थापक येतीश कटरे, अग्रणी जिल्हा प्रबंधक नरेंद्र मडावी, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. तृप्ती कटरे, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अरविंदकुमार वाघमारे, अप्पर तहसिलदार श्रीकांत कांबळे, कृषि अधिकारी पवन मेश्राम यांचेसह विविध विभागाचे कार्यालय प्रमुख उपस्थित होते.

यावेळी भैय्यासाहेब बेहेरे म्हणाले, 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनाचा कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्याकरीता सर्व विभागाचे योगदान असणे आवश्यक आहे. संबंधित यंत्रणांकडून सोपवलेली कामे निर्धारित कालावधीत व वेळेत होणे अपेक्षित आहे. सर्व कार्यालय प्रमुखांनी त्यांच्यावर सोपविलेली जबाबदारी चोखपणे पार पाडावी. अंमलबजावणी यंत्रणांनी कामात कोणतीही दिरंगाई करु नये, अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या.

 

Leave a Comment

और पढ़ें