सौंदड, दि. 11 जानेवारी : सडक अर्जुनी तालुक्यातील ग्राम सौंदळ येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील एक विद्यार्थी शाळेच्या इमारतीच्या सज्जावर बसून टिंगल टवाळी करतानाचा एक फोटो महाराष्ट्र केसरी न्यूज च्या प्रतिनिधींनी टिपला आहे, दुपारी जेवणाच्या सुट्टीतील हा फोटो आहे. सकाळी शाळेचे वेळेमध्ये विद्यार्थी शाळेमध्ये येतात शाळेत आलेल्या विद्यार्थ्यांकडे लक्ष देण्याची जबाबदारी ही शाळा प्रशासनाची आहे, यात मुख्याध्यापक व शिक्षक प्रामुख्याने जबाबदार आहेत, मात्र शाळेची सुट्टी झाल्यानंतर टवाळखोर मुले रस्त्यावर तसेच इमारतीच्या छतावर फिरताना दिसतात, ही मुले इमारतीच्या आवार भिंतीवरून, इमारतीच्या सज्जावर चढतात, त्याचबरोबर इमारतीच्या छतावर देखील चढतात, हा प्रकार अनेकवेळ पाहण्यासाठी मिळाला आहे. हे सर्व प्रकार करताना एखादा विद्यार्थी इमारतीच्या खाली पडल्यास, व त्याला गंभीर दुखापत झाल्यास, त्याचबरोबर अनावधानाने त्याचे मृत्यू झाल्यास या सर्व प्रकाराला जबाबदार कोण ? शाळा प्रशासन की पालक वर्ग राहणार असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित केला जात आहे.
सौंदड गावात तीन जिल्हा परिषद च्या शाळा आहे, तर एक लोहिया शाळा आहे, तर दोन कॉन्व्हेंट शाळा आहेत, गावात एकूण साहा शाळा आहेत, कॉन्व्हेंट शाळा म्हणजे खाजगी शाळा आहे, यात शिक्षण घेण्यासाठी पैसे मोजावे लागतात, लोहिया शाळा येथे वर्ग 5 ते 12 वी. पर्यंत शिक्षण मिळते मात्र जिल्हा परिषद च्या शाळेमध्ये कॉन्व्हेंट पासून ते वर्ग 1 ते 12 पर्यंतचे शिक्षण अगदी कमी दरात म्हणजे मोफत मिळते, गरिबांच्या मुलांचे शिक्षण अगदी मोफत व्हावे यासाठी शासन मुलांकडून कमीत कमी फी वसूल करते, मुलांना गणवेश देखील मिळतात, तर दुपारच्या जेवणाची व्यवस्था देखील जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये केली जाते, एकंदरीत सांगायचे म्हणजे शाळेमध्ये येणारे विद्यार्थी यांनी शिक्षणाकडे लक्ष देऊन आपल्या उज्वल भविष्याकडे वाटचाल केली पाहिजे, मात्र काही टवाळ खोर मुलांमुळे अन्य विद्यार्थ्यांवर शिक्षक व मुख्याध्यापक यांच्याकडून कठोर कारवाई करून त्यांच्यावर अन्याय केला जातो.
तर याच आठवड्यात लोहिया शाळेतील काही विद्यार्थी प्रार्थनेचे वेळेवर मामा तलाव कडे शौचालय करण्यासाठी गेले होते, आणि अशातच गावातील काही मुलांनी त्यांना शाळेत जाण्यासाठी त्या ठिकाणावरून हाकलून लावले होते, त्या मुळे गावात चर्चा रंगली की, काही लोक मुलं चोरी करण्याच्या प्रयत्नात आहेत, हा प्रकार खोटा असला तरी यामुळे पोलीस प्रशासनाला देखील त्रास सहन करावा लागला आहे, तलावाकडे गेलेले मुलं तलावाच्या खोल पाण्यात जाऊन अपघाती मृत्यू झाल्यास याची जबाबदारी शाळा प्रशासनावर येऊ शकते त्यामुळे शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांनी इतरत्र टिंगल टवाळी न करता शाळेतील स्वच्छालयचा वापर करावे तसेच इमारतीवर न फिरता सुरक्षित रहावे, हाच उद्देशीय या वृत्त मागचा आहे.
![Maharashtra Kesari News](https://maharashtrakesarinews.in/wp-content/uploads/2024/05/cropped-Picsart_23-12-16_14-59-10-524-150x150.png)