जमीन फेरफार प्रकरण, नायब तहसीलदार अडकला एसीबी च्या जाळ्यात.


लातूर, वृत्तसेवा, दिनांक ०४ जानेवारी २०२२ – जमिनीच्या व्यवहारात मदत करण्यासाठी १५ हजारांची लाच घेताना, लातूर जिल्ह्यातील चाकूर तालुक्यातील नायब तहसीलदार शेषराव शिवराम टिप्परसे (वय ५७) यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सोमवारी दुपारी अटक केली. या प्रकरणी चाकूर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. तक्रारदार , त्याची आई व बहीण यांच्यामध्ये जमिनीचा व्यवहार झाला होता या व्यवहारात तक्रारदार व त्यांच्या वडिलांनी बँकेचे कर्ज घेतलेले होते, त्यामुळे जमिनीवर बँकेचा बोजा होता.

बोजामुळे जमिनीचा फेरफार नोंदवण्यास बँकेचा आक्षेप होता. त्यामुळे तक्रारदाराच्या बाजूने निकाल देऊन जमिनीच्या व्यवहारात मदत करण्यासाठी १५ हजार रुपयांच्या लाचेची मागणी नायब तहसीलदार शेषराव शिवराम टिप्परसे (वय 57) यांनी तक्रारकर्त्याकडे केली होती. यावर तक्रारदारांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे यासंबंधीची माहिती दिली व सोमवार ३ जानेवारी रोजी सापळा रचून शेषराव टिप्परसे यांना अटक करण्यात आली.


 

Leave a Comment