महामानवाच्या जयंती दिनी सकारात्मक ऊर्जा घ्यावी – मधुसूदन दोनोडे


गोंदिया, सडक अर्जुनी, दिनांक 15 – तालुक्यातील ग्राम पळसगाव/राका येथे आज क्रांतीसूर्य बिरसा मुडा यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली, यावेळी प्रामुख्याने उपस्थित मा. राजेश भाऊ नंदागवळी माजी सभापती , सौ. माधुरी पातोडे माजी जी. प. सदस्य, मा. मधुसुदन दोनोडे तालुका अध्यक्ष काँग्रेस , सरपंच सौ. भारती लोथे, उपसरपंच सुनिल चादेवार , पूजा कापगते, कुंदा सावरकर, सविता मललेवार , मूर्ती दाते प्रदीप गेडाम यांचा शाल श्रीफळ देवून सत्कार करण्यात आला.

यावेळी मंचावरून पाहुण्यांनी आपले मत वेक्त केले, त्यात मधुसूदन दोनोडे यांनी प्रबोधनात्मक माहिती देत महामानव बिरसा मुंडा यांच्या जीवनावर प्रकाश टाकत माहिती दिली, ते पुढे म्हणाले महामनवाच्या जयंती दिनी मध्यप्राशन करू नये तर सकारात्मक ऊर्जा घेऊन पुढे समाज सुधारण्यासाठी कार्य करावे. यावेळी उपस्थित अशोक कापसे, भागवत कापगते, महेंद्र दिघोरे आकाश बावनकुळे, टिलाराम कापगते, भोजराज कापगते, मनीराम सावरकर, शामकला उईके, ईदिरा डिकोडवार व सर्व आदिवासी समाज तसेच गावातील मान्यवर उपस्थित होते.


 

Leave a Comment