प्रदेशध्यक्ष नाना पटोले यांची मृत वनमजूरांच्या कुटुंबीयांना सांत्वन भेट


  •  त्यांच्या पाल्यांना शासकीय नोकरीत समाविष्ट करण्याचा प्रयत्न करणार असल्याची दिली ग्वाही.

गोंदिया, सडक/ अर्जुनी, दिनांक – 12 एप्रिल 2021 – भंडारा गोंदिया जिल्ह्यात येत असलेल्या नवेगाव नागझिरा प्रकल्पातील काही भागाला काही दिवसापूर्वी आग लागलेली होती. ही आग विझवताना त्यामध्ये थाटेझरी येथील राकेश मड़ावी (वय 40 वर्षे) , धानोरी रेखचन्द राणे (वय 45 वर्षे), कोसमतोंडी येथील सचिन श्रीरंगे (वय 27 वर्षे) या 3 हंगामी वनमजुरांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. त्या तिन्ही वनमजूरांच्या घरी आज काँग्रेस प्रदेशाध्यक्ष, आमदार मा. श्री. नानाभाऊ पटोले यांनी भेट दिली आणि त्यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले.



हे ही वाचा –  16 लाखाच्या भूजल बंधाऱ्यातून वाळूचा अवेध उपसा, सौन्दड येथील प्रकार

तसेच त्यांच्या कुटुंबीयांना शासनाकडून प्रत्येकी दहा लाख रुपयांची मदत मिळाली असल्याचे सांगितले आणि त्यांच्या कुटुंबातील एका व्यक्तीला शैक्षणिक योग्यतेनुसार शासकीय नोकरीत समाविष्ट करून घेण्यासाठी देखील आपण स्वतः प्रयत्नरत असल्याचे सांगितले. त्याचबरोबर जखमी वनमजुरांच्या तब्येतीबाबत डॉक्टरांशी आणि प्रशासनाशी चर्चा करण्यात आली असून त्यांच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधार यावा या दृष्टीने प्रयत्न करण्याच्या सूचना देखील दिल्याचे त्यांनी सांगितले.

अशा प्रकारच्या दुर्दैवी घटना भविष्यात होऊ नयेत म्हणून योग्य नियोजन करून आवश्यक ती सर्व खबरदारी देखील घेतली जावी जेणेकरून अशा घटना पुन्हा होणार नाही आणि अशा घटनांचा धोका वन्यजीवांना देखील पोचणार नाही याची पूर्ण खबरदारी घेण्यात यावी अशा सूचना वनविभाग आणि प्रशासनाला दिल्याचेही सांगितले. यावेळी त्यांच्यासमवेत वनविभागाचे सर्व अधिकारी, विभागीय वन अधिकारी (वन्यजीव) पूनम पाटे, तहसीलदर श्री. खोकले, गोंदिया जिल्हा काँग्रेस अध्यक्ष एन. डी. किरसान, सड़क अर्जुनी तालुका काँग्रेस अध्यक्ष मधुसूदन दोनोडे,सड़क अर्जुनी तालुका काँग्रेस कमेटी चे तालुका समन्वयक दामोदर नेवारे.

तालुका महीला कांग्रेस कमेटी च्या अध्यक्षा किरण हटवार, कोसमतोंडी चे सरपंच महेंद्र पशिने, जिल्हा काॅग्रेस कमेटी चे पदाधिकारी डॉ के जी बोधनकर, जिल्हा महामंत्री पुष्पा खोटेले, तालुका महामंत्री ब्रम्हानंद मेश्राम, तालुका किसान काँग्रेसचे तालुकाध्यक्ष विलास कापगते, माजी जि. प. सदस्य सरीता कापगते, रंजना भोई , शंकर मेंढे, कीशोर शेंडे मुंगुलमारे, राजु वाळवे आदी उपस्थित होते.


 

Leave a Comment