ठाणेदार सचीन वांगळे यांची अवेध दारू विक्रेत्यांवर धडक कार्यवाई


गोंदिया, सडक अर्जुनी, दिनांक – 12 एप्रिल 2021 – सध्या कोरूना काळात सर्व दारू दुकाने बंद असून अवैद्य दारू विक्री करणारे लोक हे चोरीने दारू व्यवसाय करीत आहेत , त्यांच्यावर वचका बसावा व अवैध धंद्याच्या समूळ नायनाट करण्याच्या उद्देशाने दिनांक 11 रोजी पोलीस स्टेशनला चार पथके तयार करून ठाणेदार सचिन वांगडे यांनी स्वतः विशेष मोहीम राबवून त्या अनुषंगाने अवैध दारू विक्री करणाऱ्या लोकांविरुद्ध 9 गुन्हे दाखल करून 8292/- रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आले.

सदर धडक कारवाई मा.श्री विश्व पानसरे पोलीस अधिक्षक गोंदिया, श्री अतुल कुलकर्णी अप्पर पोलीस अधिक्षक गोंदिया कॅम्प देवरी , मा.श्री जालिंदर नालकुल उपविभागीय अधिकारी देवरी यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक सचिन वांगडे सफों. खेदराज राऊत, पोलीस हवालदार हरिश्‍चंद्र शेंडे, अमित मुजरिया, रवीशंकर चौधरी ,पोलीस नाईक सुनील भैंसारे, सुनील उईके ,सुरेश चंद्रिकापुरे, उत्तम दहिवले ,अनिल पाटील,घनश्याम मुळे पोलीस शिपाई महेश दुर्वे ,महिला पोलीस शिपाई रागिनी निखारे ,धर्मशिला भोयर, नीता कमाने, सुषमा मेश्राम यांनी केली.


 

Leave a Comment