आर .जे. लोहिया विद्यालयातील विद्यार्थिनीचे निबंध स्पर्धेतील सुयश

सौंदड, दि. ३० जानेवारी : लोहिया शिक्षण संस्था द्वारा संचालित रामेश्वरदास जमनादास लोहिया माध्य. व उच्च माध्यमिक विद्यालयातील वर्ग ११ वी विज्ञान शाखेची विद्यार्थिनी जानवी विश्वनाथ लंजे हिने सत्र २०२४-२०२५ मधील “वीर गाथा प्रकल्प विद्यार्थी शौर्य पुरस्कार “याअंतर्गत आयोजित निबंध स्पर्धेत सहभाग घेतला होता. तिच्या निबंधाची सडक अर्जुनी तालुक्यातून जिल्हास्तराकरीता निवड झाली आहे, दिनांक  : २६ जानेवारी २०२५ रोज राविवारला प्रजासत्ताक दिनी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, गोंदिया या ठिकाणी ट्रॉफी, प्रशस्तीपत्र व डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचे जीवन चरित्रावार आधारित पुस्तक भेट देण्यात आले.

तिच्या यशाबद्दल लोहिया शिक्षण संस्थेचे संस्थापक – संस्थाध्यक्ष जगदीश लोहिया, उपाध्यक्ष आ. न. घाटबांधे, लो.शि. संस्थेचे सचिव पंकज लोहिया, प्राचार्या उमा बाच्छल, पर्यवेक्षक डी. एस. टेंभुर्णे , प्रा. आर. एन. अग्रवाल व विद्यालयातील शिक्षक- शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी तिचे अभिनंदन करून भावी यशाच्या शुभेच्छा दिल्या. विविध स्पर्धांमध्ये भाग घेऊन यशाची परंपरा कायम ठेवावी असे मत संस्थापक- संस्थाध्यक्ष, लोहिया शिक्षण संस्था सौंदड यांनी व्यक्त केले आहे.

 

Leave a Comment

और पढ़ें