सडक अर्जुनी, दी. 29 जानेवारी : गोंदिया जिल्ह्याच्या सडक अर्जुनी तालुक्यातील ग्राम कोकणा खोबा जवळ एका बिबट चा अग्यात वाहणाच्या धडकेत मृत्यु झाला आहे, घटना स्थळी वन विभागाचे अधिकारी पोहचले, असून घटनेची नोंद घेतली आहे.
सडक अर्जुनी तालुक्यातून जाणाऱ्या कोहमारा – नवेगावबांध मार्गांवरील ग्राम कोकणा खोबा नजीक एका अग्यात वाहणाच्या धडकेत बिबट वन्य प्राण्याचा मृत्यु झाला आहे, हा अपघात रस्तापार करताना झाला आहे, अपघातात ठार झालेले बिबट वन्य प्राणी फिमेल ( मादा ) असून तिचे वय अंदाजे 2 वर्ष असेल्याचे सांगण्यात येते आहे.
ही घटना आज दी. 29 जानेवारी रोजी च्या रात्रीला 8 वाजता घडली असून वन विभागाला माहिती मिळताच घटना स्थळी सडक अर्जुनी वन विभागाचे वन परीक्षेत्र अधिकारी मिथुन तरोने, नवेगावबांध वन विभागाचे वन परीक्षेत्र अधिकारी अवगण पोहचले असून या बाबद वरिष्ठान्ना माहिती देण्यात आली असून पुढील तपास सुरु आहे. वृत्त लिहे पर्यंत उर्वरित माहिती मिळाली नाही.
