गोंदिया, दि. 30 जानेवारी : देशाच्या स्वांतत्र्यासाठी प्राणार्पण केलेल्या हुतात्म्यांच्या स्मरणार्थ आदर व्यक्त करण्यासाठी दिनांक : 30 जानेवारी रोजी दरवर्षी संपूर्ण देशभर दोन मिनिटे मौन (स्तब्धता) पाळून त्यांना आदरांजली वाहण्यात येते. त्याअनुषंगाने महाराष्ट्र शासन, सामान्य प्रशासन विभाग यांच्या निर्देशान्वये दिनांक 30 जानेवारी रोजी पोलीस अधीक्षक कार्यालय गोंदिया येथे, गोरख भामरे, पोलीस अधीक्षक गोंदिया यांचे सह पोलीस अधिकारी/अंमलदार व मंत्रालयीन स्टाफ यांनी दोन मिनिटे मौन (स्तब्धता) पाळून देशाच्या स्वांतत्र्यासाठी प्राणार्पण केलेल्या हुतात्म्यांच्या स्मरणार्थ आदरांजली वाहुन हुतात्मा दिवस पाळण्यात आले. सदर कार्यक्रमात पोलीस अधीक्षक गोंदिया यांचेसह पोलीस उप- अधिक्षक (मुख्या.)श्रीमती नंदिनी चानपुकर, पोलीस निरीक्षक रामेश्वर पिपरेवार, तसेच पोलीस अधिकारी/अंमलदार व मंत्रालयीन स्टाफ मोठया संख्येने उपस्थित होते.