संदीप मोदी यांच्या कडून सामाजिक बांधिलकी जोपासून विद्यार्थ्यांना पारितोषिक

सौन्दड, दि. 30 जानेवारी  : सडक अर्जुनी तालुक्यातील ग्राम सौन्दड येथील जिल्हा परिषद हायस्कुल येथे दरवर्षी प्रमाणे 26 जानेवरी रोजी संदीप मोदी यांचे कडून जिल्हा परिषद हायस्कुल येथील इयत्ता दहावी आणि बारावी मध्ये प्रथम क्रमांक आणि द्वीत्तीय क्रमांक प्राप्त विद्यार्थीना रोख आणि भेट वस्तू स्वरूपात गौरव करण्यात येते.

ह्या वर्षी सुद्धा इयत्ता 10 वी आणि 12 वी मधून प्रथम क्रमांक आणि द्वितीय क्रमांक प्राप्त विधार्त्यांचे भेट वस्तू देवून गौरव करण्यात आला. ह्या वेळी मंचावर निशा तोडासे (जिल्हा परिषद सदस्य) हर्ष मोदी (सरपंच ग्रामपंचायत सौंदळ) रूपाली टेंभुर्णे (माजी जिल्हा परिषद सदस्य) वर्षा शाहारे ( पंचायत समिती सदस्य ) मंजू डोंगरवार (माजी पंचायत समिती सदस्य ) कुंदा साखरे ( उपसरपंच ग्रामपंचायत सौंदड) रंजू भोई (ग्राम पंचायत सदस्य) बी. बी. हरणे माजी मुख्याध्यापक, आशीफ शेख शाळा समिती अध्यक्ष, युवा उधोजक स्वतः संदीप मोदी सह अन्य मान्यवर व विधार्थी गावकरी उपस्थित होते.

महाराष्ट्र केसरी न्युज शी बोलताना संदीप मोदी यांनी सांगितले की मी सुद्धा ह्या शाळेचा माजी विद्यार्थी होतो आणि मला विद्यार्थ्यांची गौरव करावेसे वाटते म्हणून मी दरवर्षी 26 जानेवारीला इयत्ता दहावी आणि बारावी मध्ये प्रथम आणि द्वितीय क्रमांक मिळवलेल्या विद्यार्थ्यांचे भेट वस्तू देऊन गौरव करीत असतो, त्याच बरोबर शाळेचे नवीन सत्र सुरु झाले असता जिल्हा परिषद शाळेमधील इयत्ता पाचवी आणि सहावी च्या विधार्त्यांचे भेट वस्तू देऊन स्वागत करण्यात आले होते.

Leave a Comment

और पढ़ें