तीन ट्रॅक्टर सह 15 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त, गोंदिया पोलिसांची कारवाई 

गोंदिया, दि. 30 जानेवारी : गोंदिया जिल्हयातील नदी, नाला पात्रातून अवैधरित्या रेती/वाळुचे उत्खनन करून रेती चोरी करणाऱ्या रेती तस्करांवर आळा घालण्याकरीता पोलीस अधीक्षक गोरख भामरे, अप्पर पोलीस अधीक्षक नित्यानंद झा, यांनी सर्व ठाणे प्रभारी अधिकारी गोंदिया जिल्हा यांना निर्देशित केले होते.

त्या अनुषंगाने पोलीस ठाणे रावणवाडी व उपविभागीय पोलीस अधिकारी, उपविभाग गोंदिया यांचे पोलीस पथकाने मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे दिनांक : 30 जानेवारी रोजी चे पहाटे 04 वाजता सुमारास पो. ठाणे रावणवाडी हद्दीत कारवाई करत पोलीस पथकाने ग्राम तेढवा गावा जवळील वैनगंगा नदीच्या पात्रामधुन अवैध रेती (वाळु) उत्खनन करणा-या तस्करांवर छापा घालून व 03 ट्रैक्टर ताब्यात घेण्यात आले, चालक व ट्रॅक्टर मालंकावर कारवाई करण्यात आली आहे, एकुण तीन ट्रॅक्टर किंमत 15 लक्ष 18 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

सदरची कारवाई पोलीस अधिक्षक गोरख भामरे, अपर पोलीस अधिक्षक श्री. नित्यानंद झा, यांचे निर्देश आदेशाप्रमाणे उपविभागीय पोलीस अधिकारी, उपविभाग गोंदिया श्रीमती रोहीणी बानकर, यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस ठाणे रावणवाडीचे पो.नि. वैभव पवार, स.पो.नि. सुनिल अंबुरे, अंमलदार संजय चौव्हाण, सुशिल मलेवार, छगन विठठले, मनोज राऊत, कृष्णा कटरे यांनी कामगीरी बजावली आहे.

Leave a Comment

और पढ़ें