रावणवाडी येथे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे हरीश बंसोड यांनी ढोल ताशाच्या गजरात पुष्पगुच्छ देऊन केले स्वागत !

  • अर्जुनी मोर विधानसभा क्षेत्रात काँग्रेसला जिवंत करण्याचे काम हरीश बंसोड यांनी केले, जनसंवाद यात्रेत बजावली मोलाची कामगिरी!

गोंदिया, दिनांक 14 सप्टेंबर 2024 : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी विधानसभा अध्यक्ष नाना पटोले हे 13 सप्टेंबर रोजी गोंदिया दौऱ्यावर होते, दरम्यान गोंदिया येथील वीरसी विमानतळावर त्यांचे आगमन झाले, त्यानंतर ते वाहनाच्या ताफ्याने गोंदियाच्या दिशेने विमानतळावरून निघाले असता, गोंदियाच्या पूर्वी असलेल्या रावणवाडी येथील राजीव गांधी गेट समोर ढोल ताशाच्या गजरात व फटाक्याच्या आवाजात आपल्या कार्यकर्त्यांना घेऊन हरिष बंसोड यांनी कॉग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पाटोले व महाराष्ट्र कॉग्रेस पक्षाचे प्रभारी रमेश चेन्नीथला या दोन्ही बड्या नेत्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले, यावेळी अर्जुनी मोर विधानसभा क्षेत्रातील एकमेव व्यक्ती ज्यांनी या ठिकाणी नानाचे स्वागत केले असून, वीरसी विमान तळापासून ते गोंदिया पर्यंत नाना भाऊ यांच्या आगमनाार्थ शुभेच्छा देणारे बॅनर लावले होते, तसेच या ठिकाणी असलेल्या महामानवांचे संविधान देतानाच्या प्रतिमेला माल्याअर्पण करण्यात आले असून पुढील कार्यक्रमासाठी आगमन केले.

गोंदिया येथे (13 सप्टेंबर) रोजी माजी आमदार गोपालदास अग्रवाल यांनी भाजप पक्षाला राम राम करीत काँग्रेस पक्षामध्ये पक्षप्रवेश केला आहे, म्हणजेच, घरवासी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यक्रमाला कॉग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले, महाराष्ट्र कॉग्रेस चे प्रभारी रमेश चेन्नीथला, विरोधी पक्ष नेते विजय वड्डेटीवार, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चौव्हान, सुनील केदार माजी मंत्री, खासदार प्रशांत पडोळे, खासदार नामदेवराव किरसान, आमदार सहसराम कोरोटे, यांच्या शह अनेक कॉग्रेस पक्षाच्या नेत्यांनी व कार्यकर्त्यांनी हजेरी लावली होती.

हरिष बंसोड यांनी अर्जुनी मोर विधानसभा क्षेत्रात काँग्रेसला जिवंत करण्याचे काम केले ?

दोन वर्षा पूर्वी हरीश बनसोडे यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता, त्यापूर्वी त्यांनी भारतीय जनता पक्षाकडून कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक लढून पहिल्यांदाच राजकारणामध्ये प्रवेश केला आणि पहिल्याच प्रयत्नात त्यांचा दणदणीत विजय झाला असून ते सडक अर्जुनी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक झाले. सांगायचं म्हणजे ही निवडणूक भारतीय जनता पक्षाच्या सिम्बॉल वर नसल्यामुळे ते भाजपचे कार्यकर्ते नव्हतेच, हरीष बंसोड हे राजकारणी नसून बिझनेसमॅन होते, कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक जिंकल्यानंतर काही महिन्यांनी ग्राम पंचायत च्या निवडणुका लागल्या आणि त्यांची पत्नी सौ. अनुराता हरिष बंसोड या सावंगी गावच्या सरपंच झाल्या, अश्या लागोपाठ दोन्ही निवडणुका जिंकल्यानंतर हरीश बनसोड यांना राजकारणाची आवड निर्माण झाली आणि त्यामुळेच त्यांनी डोक्यात नवीन स्वप्न रुजवले की येत्या काळामध्ये विधानसभेच्या निवडणुका लागणार आणि यामध्ये आपल्याला संधी मिळाल्यास संधीचे सोने कसे करता येईल त्याचे प्रयत्न त्यांनी सुरू केले.

नाना पटोले यांच्या वर विश्वास करून दीड ते दोन वर्षांपूर्वी हरीश बनसोडे यांनी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला, तसे त्यांचे वडील देवराम मंगरू बंसोड हे मूळचे काँग्रेस पक्षाला मानणारे होते, असे हरीश बनसोड सांगतात, बंसोड सांगतात की मला भारतीय जनता पक्षाची विचारसरणी न पटल्यामुळे मी नाना पटोले यांना पाहता काँग्रेस पक्षामध्ये पक्षप्रवेश केला होता, तसेच त्या काळात काँग्रेसकडे एक दोन लोक सोडल्यास विधान सभा निवडणुकी करीता पाहिजे तसा चेहरा नव्हताच.

एकीकडे भारतीय जनता पक्षाची देशात आणि राज्यामध्ये सत्ता होती, त्याच काळात भारतीय जनता पक्षामध्ये अनेक नेत्यांचे पक्ष प्रवेश सुरू होते, असे असताना देखील हरीश बंसोड यांनी काँग्रेस पक्षामध्ये पक्षप्रवेश करून काँग्रेस पक्षाला या भागात जिवंत करण्याचे काम केले.

सांगायचं म्हणजे अर्जुनी मोर. विधानसभा क्षेत्रामध्ये काँग्रेसचे अनेक कार्यकर्ते पूर्वी होते आणि आजही आहेत, मात्र दोन ते तीन वर्षांपूर्वी या भागामध्ये काँग्रेस नाहीसे झाल्याचे चित्र होते, कारण भारतीय जनता पार्टीचा संपूर्ण देशात दब दबा होता, आणि याच काळामध्ये हरीश बंसोड यांनी अर्जुनी मोर. विधानसभा क्षेत्रामध्ये सर्वत्र स्वखर्चाने बॅनर व पोस्टर लावून पुन्हा गावा गावामध्ये काँग्रेस पक्षाचे चिन्ह व नाना पटोले यांचा चेहरा पोहोचवण्याच काम मी केले असल्याचे हरीश बंसोड सांगतात.

जनसंवाद यात्रेत हरिष बंसोड यांचे सहभाग!

त्याच काळामध्ये काँग्रेस पक्षाकडून जन संवाद यात्रेचे आयोजन अर्जुनी मोर. विधानसभा क्षेत्रामध्ये करण्यात आले होते, आणि या संपूर्ण यात्रेमध्ये हरीश बनसोड यांनी मोलाची कामगिरी बजावत नाना पटोले यांच्या खांद्याला खांदा देत प्रत्येक गावा गावांमध्ये फिरून काँग्रेस पक्षाचा प्रचार केला, एक दोन नाव सोडली तर जी आता काँग्रेस पक्षाकडे अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्राची उमेदवारी मागत आहेत ही नावे त्या काळामध्ये दिसत नव्हती, सांगायच तात्पर्य म्हणजे, “आयत्या बिळावर नागोबा” ही मन ग्रामीण भागामध्ये रुजली आहे.

आणि राजकारणामध्ये देखील असे प्रत्यय आपल्याला अनेक वेळ पाहायला मिळते, सध्या स्थिती काँग्रेस पक्षाकडे तब्बल 17 अर्जदारांनी अर्जुनी मोर विधानसभा क्षेत्राची उमेदवारी मागण्यासाठी अर्ज केले आहेत, मात्र ज्या वेळी काँग्रेस पक्षाला अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्रामध्ये वाईट दिवस होते, त्यावेळी मात्र यातील अनेक नामांकित चेहरे गायब झाले होते. लोकसभा निवडणुकीनंतर काँग्रेसला राज्यामध्ये अच्छे दिन आले आणि हेच पाहता काँग्रेसमध्ये उमेदवारांची गर्दी वाढल्याचे चित्र आहे, आता येत्या काळात अर्जुनी मोर विधानसभा क्षेत्रातील उमेदवाराची तिकीट नाना पटोले कुणाला देतात हे पाहण्यासारखे असेल.

 

Leave a Comment

और पढ़ें