राका येथील स्मशान शेडचा मलबा नदीच्या पुरामुळे गेला वाहून 

सडक अर्जुनी, दिनांक 11 जानेवारी : तालुक्यातील ग्राम राका येथील स्मशान शेड नीकामी झाल्याचे चित्र आहे, पावसाळ्यात आलेल्या पुरामुळे, स्मशान शेड च्या खाली असलेला बेस चा संपूर्ण मलबा पुरामुळे वाहून गेला आहे, त्यामुळे आता मृतदेहांचे अंतिम संस्कार करण्यासाठी राका ग्राम वासियांना नदी चा आसरा घ्यावा लागणार आहे, चुलबंद नदीच्या अगदी काठावर या स्मशान शेडची निर्मिती करण्यात आली होती.

गेल्या अनेक वर्षापासून, हा स्मशान शेड येथे उभा आहे, त्याचबरोबर आलेल्या नागरिकांना बसण्यासाठी या ठिकाणी सभा मंडपाचे निर्माण 5 वर्षे पूर्वी करण्यात आले होते, आता ग्रामपंचायत प्रशासन स्मशान सेड निर्मिती बाबत काय भूमिका घेते हे पाहण्यासारखे असेल. गावातील नागरिकांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांचा अंतिम संस्कार करण्यासाठी समस्यान शेडची आवश्यकता असते, ऊन, वारा, पाऊस पासून बचाव करण्यासाठी या शेडचा मोठा उपयोग होतो, मृत देहाचे अंतिम संस्कार वेळी म्हणजे शरीराला जाळण्यासाठी या शेडचा वापर होतो.

Leave a Comment

और पढ़ें