सडक अर्जुनी, दिनांक 11 जानेवारी : सडक अर्जुनी तालुक्यातून वाहणाऱ्या चुलबंद नदीवर, राका ते सौंदड या मार्गावर कोल्हापुरी बंधाऱ्याची निर्मिती अंदाजे दहा वर्षे पूर्वी करण्यात आली आहे, या कोल्हापुरी बंधाऱ्याचा उपयोग पाणी अडवण्यासाठी मुख्यत्व केला जातो, मात्र या बंधाऱ्याच्या वर स्लॅप टाकून याचा वापर प्रवाशी वाहतुकीसाठी करण्यात येत आहे.
गेली चार ते पाच वर्षे पूर्वी याच बंधाऱ्याच्या पुलावर असलेले कठळे नदीला आलेल्या पुरामुळे वाहून गेली, तर उरलेले काही लोखंडी पाईप भुरट्या चोरट्यांनी चोरून नेले, आता येथे कठडे बसावे या करीता प्रसार माध्यमांनी गेली चार ते पाच वर्षे पासून सतत बातम्या प्रकाशित केल्या आणि त्याचाच फलित म्हणून 2023 – 2024 मध्ये या कठड्यांच्या बांधकामासाठी तब्बल दहा लक्ष रुपयाची निधी मंजूर ही झाली मात्र सदर काम निकृष्ट दर्जाचा होत असल्याचे चित्र आहे.
या पुलाच्या कड्याचे काम करणाऱ्या कंत्राटदाराने इंगल उभे करून निर्माण केलेले कॉलम च्या बाजूला व भीम टाकण्यात आलेल्या अनेक ठिकाणी खड्डे सदृश्य चित्र आहेत, काही भागात टाकलेल्या लोखंडी सळाकी दिसतात, तर या गावातील काही नागरिकांनी सांगितलं की या निर्मानाधीन कामावर सदर कंत्राट दाराने पाणीच टाकले नाही, त्यामुळे चार ते पाच वर्षाच्या कालावधीनंतर मंजूर झालेले काम असं निकृष्ट दर्जाचे होत असेल तर हे काम किती दिवस टिकणार असा सवाल या निमित्ताने उपस्थित केला जात आहे.
असेच संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी या वृत्ताची दखल घेत कंत्राटदारावर कारवाई करावी अशी मागणी देखील या निमित्ताने केली जात आहे, सदर काम 10 लक्ष रुपयाचे मंजूर केले असले तरी कंत्रदाराने सदर काम अत्यंत कमी खर्चात करून मोठी रक्कम वाचवल्याचे बोलले जात आहे, त्यामुळे या सर्व प्रकाराचा गांभीर्य स्थानिक लोकप्रतिनिधी यांनी देखील घ्यावं असंही या निमित्ताने बोलले जात आहे. या पुलावरून रोज शेकडो नागरिक आणि विद्यार्थी प्रवास करतात त्यामुळे या पुलाचे काम मजबूत आणि टिकाऊ झालं पाहिजे तर ते दीर्घकाळ टिकलं पाहिजे अशी अपेक्षा प्रवासी नागरिकाकडून केली जात आहे.