खास शंकरपट निमित्त मौजा राका/प. येथे “आई तूच माझी माऊली” हे नाट्य प्रयोग

सडक अर्जुनी, दि. 13 जानेवारी : सडक अर्जुनी तालुक्यातील ग्राम राका येथे खास शंकर पट निमित्ताने जय अंबे नाट्य मंडळ राका यांच्या सौजन्याने दिनांक : 18 जानेवारी रोज शनिवारला रात्री 09 वाजता “आई तूच माझी माऊली” या नाट्यप्रयोगाचे आयोजन करण्यात आले आहे. संत तुकाराम महाराज भव्य पटांगणावर या नाटकाचे आयोजन करण्यात आले आहे, सदर कार्यक्रमात उद्घाटक म्हणून भंडारा गोंदिया जिल्ह्याचे खासदार प्रशांत पडोळे, सह उद्घाटिका कविताताई रंगारी जिल्हा परिषद सदस्य गोंदिया, कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी राजकुमार बडोले आमदार अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्र, तर उपाध्यक्ष स्थानी डॉक्टर भुमेश्वर पटले, लायकराम भेंडारकर, निशा तोडासे, किशोर तरोने, माधुरी पातोडे, मिलन राऊत, तर रंगमंच पूजक संगीता खोब्रागडे, शालिंदर कापगते, सपना नाईक, राजेश रामटेके, हर्ष मोदी तसेच विशेष अतिथी स्थानी गिरधारी हत्तीमारे, राजेश कठाने, अशोक लंजे, लक्ष्मण धानगाये, मधूसुधन दोनोडे सह अन्य पाहुणे उपस्थित राहणार आहेत.

Leave a Comment

और पढ़ें