ललितकुमार बाळबुद्धे यांच्या हस्ते टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा संपन्न.

अर्जुनी मोर., दि. 13 जानेवारी : विनर एम.एल. क्रिकेट क्लबच्या सौजन्याने अर्जुनी मोरगाव येथे रात्र कालीन सेवन ए साईट टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धाचे आयोजन दिनांक : 03 जानेवारी पासून ते अंतिम सामन्यापर्यंत करण्यात आले होते, यामध्ये प्रथम पारितोषिक 25 हजार रुपयाचे होते तर द्वितीय पारितोषिक 15 हजार रुपयाचे होते तसेच तृतीय पारितोषिक 9 हजार रुपये चे होते, सदर कार्यक्रमाचे बक्षीस वितरण दिनांक : 12 जानेवारी 2025 रोजी संपन्न झाले, असून प्रथम बक्षीस भंडारा येथील क्रिकेट क्लब ला मिळाले.

बक्षीस वितरण ललित कुमार बाळबुध्दे अध्यक्ष विविध कार्यकारी सेवा सहकारी संघ. यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले, यावेळी श्री. दानजी पालीवाल, आशीष कापगते, युवराज डोगरवार, जितेंद्र लोदी, संजय राऊत, घनश्याम वाढई, सुभाष लाडे, हेमराज कुंभरे, संजय सिंगनजुडे, मानीक मस्के, प्रथम बक्षिस जिकलेले भंडारा संघ, द्वितीय बक्षिस विनर क्रिकेट संघ मोरगाव, तृतीय बक्षिस निलज संघ व समस्त गावकरी मंडळी यांच्या उपस्थितीत संपन्न झाले.

Leave a Comment

और पढ़ें