जवाहर नवोदय विद्यालयचा शिक्षक झाला डिजिटल अरेस्ट; 13 लाख 44 हजार रुपये ची ऑनलाईन फसवणूक

  • यह बात किसी को बताना नही अगर बताये तो आपको और आपके परिवार की जान को खतरा है. यह नॅशनल सिक्रेट है असे म्हणत लाखो रूपाचा गंडा घातला आहे. 

गोंदिया, दि. 13 जानेवारी : डिजिटल अरेस्टच्या नावाखाली एका शिक्षकाची बनावट पोलीस अधिकाऱ्याकडून लाखो रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार अर्जुनी मोरगाव तालुक्यातील नवेगाव बांध येथे घडला असून या प्रकारामुळे तालुक्यात चिंतेचे वातावरण पसरले आहे. सविस्तर प्रकरण काय आहे ते समोर पाहूया. 

नवेगावबांध पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादि भोजलाल रामलाल लिल्हारे वय 51 वर्ष शिक्षक, रा. लवेरी तालुका- किरणापूर जिल्हा- बालाघाट ह. मु. जवाहर नवोदय विद्यालय नवेगावबांध, तालुका अर्जुनी मोर. जिल्हा गोंदिया असे असून यांची ऑनलाइन फसवणूक करण्यात आली आहे, प्रकाश अग्रवाल असे आरोपीचे नाव असून यांचे मोबाईल क्रमांक – 82578 85667 असे असून त्यांनी दिनांक 26/12/24 रोजी पासून फसवणूक केल्या प्रकरणी नवेगावबांध पोलीस ठाण्यात त्यांच्या विरुद्ध विविध कलमान्वये तक्रार दिनांक 10/1/ 2025 रोजी दाखल करण्यात आली आहे. 

आरोपी प्रकाश अग्रवाल यांनी फिर्यादीचे मोबाईल क्रमांक 8210107669 वर फोन करून व्हाट्सअप कॉल वरून फिर्यादीस मै पी.ओ. प्रकाश अग्रवाल बॅच नंबर- 3378 क्राईम ब्रांच मुंबई से बात कर रहा हूं ! आपके नाम पर मुंबई ठाणे मे ईलिगल एडोटाइजमेंट अँड हरासमेंट का केस दर्जे है! और आपके नाम से कॅनरा बँक मे खाता खोला गया है.

और नरेश गोयल ने 2 करोड रुपये अकाउंट से फ्रॉड किया है! जिसके आप 148 वे सस्पेक्ट हो. जिसका 20 % कमिशन आपको दिया है. इसलिये आप अपने सभी खातो की जानकारी दो उनकी जाच होगी, और ये पैसा आपका सायबर सेफ कस्टडी खाता मे ट्रान्सफर करना होगा! ट्रान्सफर नही किये, तो आपको मुंबई क्राईम ब्रांच मे आना होगा. या तो फिर आपको अरेस्ट करके लायेंगे, तो आपकी क्या इज्जत रह जायेगी, सही पाया गया तो आपके पैसे वापस हो जायेंगे. यह बात किसी को बताना नही अगर बताये तो आपको और आपके परिवार की जान को खतरा है. यह नॅशनल सिक्रेट है.

तुम अभी के अभी एन. आय. खाते मे पाच लाख रुपये ट्रान्सफर करो असे आरोपीने मी लोकसेवक आहे असे बतावणी करून बनावट अरेस्ट वॉरंट मोबाईल व्हाट्सअप वर दाखवून बोलल्याने फिर्यादीने दिनांक :  28/12/2024 ला 5 लाख रुपये दिनांक : 27/12/24 ला 4 लाख 68 हजार रुपये व 99 हजार रुपये दिनांक 28/12/ 24 ला तसेच 2 लाख 77 हजार रुपये असे एकूण 13 लाख 44 हजार रुपये आरोपीने सांगितलेल्या बँक खाते क्रमांक वर पाठविले असल्याची माहिती दिली आहे.

तर मोबाईल क्रमांक : 8257885567 चा धारक इसम नामे प्रकाश अग्रवाल यांनी फिर्यादीस अरेस्ट करण्याची धमकी देऊन फिर्यादीची एकूण 13 लाख 44 हजार रुपये ची ऑनलाईन फसवणूक केली आहे,  असा फिर्यादीच्या तोंडी तक्रार वरून आरोपीचे कृत्य वरील कलमान्वये होत असल्याने आरोपी विरुद्ध अप क्रमांक : 03/ 2025 कलम 336 (2), 319 (2), 318 (4), 340 (1), 340 (2), 204, 351 (2) भा. न्या. स. 2023 सह कलम-66 (D) माहिती तंत्रज्ञान कायदा 2000 अन्वय गुन्हा दाखल करण्यात आला असून नवेगावबांध पोलीस घटनेचा तपास करीत आहेत. 

 

Leave a Comment

और पढ़ें