रेल्वे अधिकारी, कर्मचाऱ्यांमध्ये आनंद, बघेल यांच्या उत्कृष्ट कार्याची घेतली दखल.
गोंदिया, दि. 09 जुन 2024 : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेत आहेत. या सोहळ्यासाठी देश, विदेशातील विविध मान्यवरांना आमंत्रित करण्यात आले आहे. या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी दक्षिण पूर्व मध्य रेल्वे विभागांतर्गत गोंदिया येथे कार्यरत सहायक लोको पायलट स्नेहसिंह बघेल यांना निमंत्रित करण्यात आले. बघेल यांना हे निमंत्रण ‘वंदे भारत’ टीमचे एक
प्रमुख सदस्य म्हणून मिळाल्याची माहिती आहे. यामुळे गोंदिया विभागातील रेल्वे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. स्नेहसिंह बघेल हे दक्षिण पूर्व मध्य रेल्वे विभागाच्या गोंदिया लॉबीत कार्यरत वरिष्ठ सहायक लोको पायलट म्हणून गेल्या चार वर्षांपासून आहेत. वंदे भारत ट्रेनसह इतर रेल्वे गाड्यांसाठी बघेल यांनी केलेल्या कामाची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दखल घेतली असून, त्यांना आज रविवारी होणाऱ्या शपथविधी सोहळ्यासाठी गौरव असल्याचे कर्मचाऱ्यांनी निमंत्रित केल्याची माहिती आहे. बघेल हे मिशन कर्मयोगीअंतर्गत प्रशिक्षण प्राप्त करणारे सहायक लोको पायलट आहेत.
वंदे भारत ट्रेन ही आधुनिक आणि दर्जेदार सुविधांसाठी देशभरात ओळखली जात असून, या ट्रेनमध्ये प्रवाशांना उत्कृष्ट सेवा देण्यासाठी रेल्वे महा व्यवस्थापक व दक्षिण पूर्व मध्य रेल्वे विभागातील सर्व अधिकारी, कर्मचारी, सहायक लोको पायलट स्नेहसिंह बघेल हे कार्यरत आहेत. त्यांच्या याच कार्याची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दखल घेतल्याचे बोलले जात आहे .
बघेल नागपूर -बिलासपूर वंदे भारत एक्स्प्रेसच्या शुभारंभादरम्यान लोको पायलटच्या दलातसुद्धा सहभागी होते. बघेल यांना शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहण्याचे निमंत्रण मिळाल्याने रेल्वे अधिकारी व कर्मचाऱ्यांत आनंदाचे वातावरण आहे. स्नेहसिंह बघेल हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 3.0 सोहळ्याला उपस्थि होण्यासाठी गोदियाहून शुक्रवारी (दि. ७) दिल्ली येथे सुरक्षा प्रक्रिया पार पाडण्यासाठी त्यांना पोहोचण्याचा निरोप पंतप्रधान कार्यालयाने दिला होता. त्यामुळे बघेल हे शुक्रवारी विमानाने दिल्लीत पोहोचले.