कोट्यवधींच्या धानाला फुटले अंकुर उचल कधी?


आ. सहषराम कोरोटे यांनी अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या प्रधान सचिवाला दिले निवेदन.


गोंदिया, दि. 09 मे 2024 : गोंदिया जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी रब्बी हंगामात उत्पादित केलेला धान्य खरेदी करण्यासाठी जिल्हा मार्गकेटींग फेडरेशन आणि आदिवासी विकास महामंडळाने तात्काळ शासकीय आधारभूत धान्य खरेदी केंद्र सुरु करून शेतकऱ्यांचा धान्य खरेदी करावे या मागणीसाठी आमगाव देवरी विधानसभा क्षेत्राचे आमदार सहसराम कोरोटे यांनी प्रधान सचिव, अन्न व नागरी पुरवठा विभाग महाराष्ट्र शासन याना निवेदन देत विनंती केली आहे.

गोंदिया जिल्यातिल शेतकऱ्यांनी रब्बी हंगामात उत्पादित केलेला धान पीक निघून पंधरा दिवसाच्या वर कालावधी लोटला असून जिल्यात अद्यापही शासकीय आधारभूत धान्य खरेदी केंद्र सुरु न झाल्याने कमी भावात खाजगी व्यापाऱ्यांना धान्य विकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली असून शेतकऱ्यांची ही आर्थिक पिळवणूक थांबवण्यासाठी शाशनाने त्वरित शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्र सुरू करावे. अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

तर खरीप हंगामात आदिवासी विकास महामंडळाने शेतकऱ्यानं कडून खरेदी केलेला १० लक्ष किवींटल धान्य तसेच जिल्हा मार्केटींग फेडरेशन ने शेतकऱ्यांकडून खरेदी केलेला २५ लक्ष किवींटल धान्य गोदामात तसेच उघड्यावर पडून असल्याने आणि सतत येणाऱ्या अवकाळी पावसाने खरेदी केलेला धान्य पाण्याने भिजत असून अंकुर आल्याने संस्था चालकांचे नुकसान होत असून खरेदी केलेल्या धनाची भरडाई लवकरात लवकर करावे अशी मागणी आमदार सहसराम कोरोटे यांनी प्रधान सचिव, अन्न व नागरी पुरवठा विभाग महाराष्ट्र शासन यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.


 

Leave a Comment

और पढ़ें