राजकुमार बडोले यांच्या प्रचारासाठी खा. पटेल, गडकरी यांनी घेतली प्रचार सभा.

सडक अर्जुनी, दि. 18 नोव्हेंबर : अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्राचे महायुतीचे उमेदवार माजी मंत्री राजकुमार बडोले यांच्या प्रचारासाठी आज दि. 18 नोव्हेंबर रोजी केंद्रिय मंत्री नितीन गडकरी आणी खा. प्रफुल पटेलानी प्रचार सभा घेत राजकुमार बडोले हे जिंकूनच येतील असा विश्वास व्यक्त केला आहे.

या निवडणुकीत राजकुमार बडोले हे महायुतीचा घटक पक्ष अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस च्या घड्याळ चिन्हा वर निवडूनक लढवीत असून पक्ष श्रेष्टीनी निर्णय घेतल्यामुळे मी राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाच्या घड्याळ चिन्हवार निवडणूक लढत असल्याचे मत महायुतीचे उमेदवार माजी मंत्री राजकुमार बडोले यांनी व्यक्त केले आहे. नितीन गडकरी आणी खा. प्रफुल पटेल यांचे भाषण ऐकन्या करिता हजारो लोकांनी गर्दी करीत महायुतीचे उमेदवार माजी मंत्री राजकुमार बडोले यांना निवडून देऊ असा विश्वास दिला आहे.

Leave a Comment

और पढ़ें