गोंदिया, दि. 18 नोव्हेंबर : अदासी ता. गोंदिया येथे आज 18 नोव्हेंबर रोजी राष्ट्रवादी काँग्रेस, भाजपा, शिवसेना, आरपीआय महायुतीचे गोंदिया विधानसभा क्षेत्रातील उमेदवार श्री. विनोद अग्रवाल यांच्या प्रचारार्थ खासदार श्री. प्रफुल पटेल यांच्या प्रमुख उपस्थितीत महायुती च्या मित्रपक्षांची संयुक्त सभा संपन्न झाली.
राज्याला प्रगती पथावर नेण्यासाठी महायुतीच्या सरकारने अनेक क्रांतिकारी निर्णय घेतले आहेत. महिलांसाठी लाडली बहीण योजना, मुलींना उच्च मोफत शिक्षण, शेतकऱ्यांना मोफत विज बिल, किसान सन्मान योजना या सारख्या योजनांच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेचे जीवन बदलण्याचे काम आमचे सरकार करीत आहे.
भंडारा व गोंदिया जिल्हयातील शेतकऱ्यांना उन्नतीसाठी व या क्षेत्राला सुजलाम सुफलाम करण्याच्या दृष्टीने डांगोरली, धापेवाडा व अन्य अनेक मध्यम व लघु सिंचन प्रकल्प, शेतकऱ्यांना बोनस देणे यासारख्या अनेक विकास कामांना प्राधान्य देऊन व भविष्यात या क्षेत्राचा विकास व्हावा यासाठी महायुतीचे उमेदवार श्री विनोद अग्रवाल यांना प्रचंड बहुमताने विजयी करा जेणे करुन आम्ही दोन्हीं मिळून विकास कामांना गती देण्याचे काम करू असे आवाहन खासदार श्री प्रफुल पटेल यांनी केले
सर्वश्री प्रफुल पटेल, विनोद अग्रवाल, जगदीश बाहेकर, मुनेश राहंगडाले, कुंदन कटारे, सुरेश हर्षे, आशिष हत्तीमारे, सुधीर ब्राम्हणकर, पवन धावड़े, कपील बावनथड़े, अशोक गौतम,टीकाराम मेंढे, कमलबापू बहेकार, गिरी महाराज, संजु टेम्भूर्णिकर, निर्मल बहेकार, सीता राहंगडाले, राधाकृष्ण ठाकुट, रेखा लिल्हारे, धम्मदीप गनवीर, भोला मेश्राम, दीनदयाल राहंगडाले, राम शंकराचार्य, सुबोध वंजारी, रामेश्वर बनकर, दारासिंग राठौड़, प्रभा बहेकार, सावन बहेकार , किषोर दूधबरई, तिलक दूधबरई, कनीराम तवाड़े, जितेंद्र बिसेन, रोमेंद्र बिसेन सहित मोठ्या संख्येने पदाधिकारी व मतदार उपस्थित होते.