सौंदड, दि. 18 नोव्हेंबर : लोहिया शिक्षण संस्था द्वारा संचालित आर. जे. लोहिया माध्य. व उच्च माध्यमिक विद्यालय, रामदेवबाबा अध्यापक विद्यालय व जमुनादेवी लोहिया प्राथमिक शाळा सौंदड यांच्या संयुक्त विद्यमाने, महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 SVEEP कार्यक्रमांतर्गत मतदान जनजागृती व मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी सकाळी 11.30 वाजता विद्यार्थ्यांना त्यांच्या आई वडीलापर्यंत पोहचविण्यासाठी मतदान चिट्टीचे वाटप करण्यात आले. यावेळी विद्यालयाच्या प्राचार्या मा. उमा बाच्छल, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Author: Maharashtra Kesari News
Post Views: 236