गोरेगाव तालुक्यात डॉ. सुगत चंद्रिकापुरे यांचा झंजावात प्रचार दौरा!

  • उमेदवार पोहोचले बांधावर, शेतकऱ्यांशी साधला संवाद 

गोरेगाव, दि. 18 नोव्हेंबर : प्रहार जनशक्ती पक्ष व गोंडवाना गणतंत्र पार्टी तसेच परिवर्तन महाशक्ती तिसरी आघाडी चे अधिकृत उमेदवार डॉ. सुगत मनोहर चंद्रिकापुरे यांचा आज दिनांक 14 रोजी गोरेगाव तालुक्यात झंजावात प्रचार दौरा आयोजित करण्यात आला होता या दौऱ्याप्रसंगी उमेदवार डॉ. सुगत चंद्रिका पुरे हे गावागावात पोहोचून मतदारांची संवाद साधून आपण योग्य व्यक्तीची निवड करून मतदान करावं. व या विधानसभा क्षेत्रासाठी युवा उमेदवाराला अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्राच्या निवडणुकीत विजय करावं असे आव्हान केले.

एवढेच नव्हे तर प्रत्यक्ष मतदारांच्या बांधापर्यंत पोहोचून आपण सर्वजण मिळून या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मला विजयी करा अशी मागणी मतदाराकडून केली. शेतकरी, आणि मजुरांनी सुद्धा भाऊ आम्ही तुमच्याच पाठीशी उभे राहू असा विश्वास दिला. तर गावागावात डॉक्टर सुगत चंद्रिकापुरे यांच्या प्रचार दौऱ्याप्रसंगी उस्फुर्त प्रतिसाद मिळत आहे. आधी सुद्धा आम्ही तुमच्या सोबत होतो.

आताही तुमच्या सोबत राहू , अशी भूमिका मतदारांनी घेतल्याने मतदारांच्या कौल आता तिसऱ्या आघाडीच्या दिशेने झुकत असल्याचे दिसून येत आहे. तुमच्या सारखा युवा नेतृत्व लाभलेला उमेदवार आम्हाला आता उपलब्ध झाल्याने या विधानसभेत निश्चितच येणाऱ्या काळात बदल घडवून येणार अशा प्रतिक्रिया अनेक गावातील नागरिक आता उमेदवाराला देऊ लागले आहेत.

Leave a Comment

और पढ़ें