अजय लांजेवार यांचे पारडे जड विजयाकडे वाटचाल असल्याचा विश्वास! 

  • महायुतीच्या बंडखोरीमुळे राजकुमार बडोले यांना होणार नुकसान : अजय लांजेवार 

सडक अर्जुनी, दी. 19 नोव्हेंबर : महाराष्ट्रामध्ये विधानसभा निवडणूक 2024 होऊन घातली आहे, अश्यातच गोंदिया जिल्ह्यातील संपूर्ण वातावरण तापले असताना सुद्धा जिल्ह्यातील अर्जुनी मोर विधानसभेचे चित्र आता स्पष्ट व्हायला लागले आहे. अर्जुनी/ मोर विधानसभा (063) मध्ये महायुतीचे उमेदवार राजकुमार बडोले हे घड्याळ चिन्हावर निवडणूक लढत असल्यामुळे त्यांच्या जुना पक्ष भाजपाचे बबन कांबळे, रत्नदीप दहिवले, तसेच राजेश खोटले हे बंडखोरी करून रिंगणात आहेत अशी माहिती अजय लांजेवार यांनी देत ते पुढे म्हणाले.

त्याच प्रमाणे राष्ट्रवादीचे बंडखोर डॉक्टर सुगत चंद्रिकापुरे यांनी सुद्धा राष्ट्रवादीची बंडखोरी करून प्रहार जनशक्ती पक्ष उमेदवारी घेऊन निवडणूक लढत आहे. तसेच राष्ट्रवादी (शरद पवार गट) बंडखोर निता साखरे या सुद्धा राष्ट्रवादीच्या उमेदवारी मागत होत्या तर दानेश साखरे हे राष्ट्रवादीचे उमेदवारी च्या शर्यतीत होते. परंतु महाविकास आघाडीत काँग्रेसचे उमेदवार दिलीप बन्सोड जरी असले तरी काँग्रेसचे बंडखोर उमेदवार डॉक्टर अजय लांजेवार हे देखील जनतेचे उमेदवार म्हणून रिंगणात असल्यामुळे निवडणुकीत अधिक रंग चढला.

काँग्रेसचे उमेदवार दिलीप बन्सोड यांना जनतेकडून बाहेरची पार्सल असे संबोधित असल्यामुळे जनतेचा उमेदवार डॉक्टर अजय लांजेवार यांच्याकडे कौल दिसून येत आहे. शेवटी निर्णय जनतेच्या आहे. येणाऱ्या 23 नोव्हेंबर च्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले. सर्व भूमिका निकालानंतर स्पष्ट होईल. असे मत अजय लांजेवार यांनी वेक्त केले. 

Leave a Comment

और पढ़ें