सडक अर्जुनी, दि. 04 डिसेंबर : मंडईच्या निमित्ताने रात्रीच्या वेळी मनोरंजनासाठी ग्रामीण भागात विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. या सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून नागरिक एकत्र येत असतात. विचारांची आदान-प्रदान सुद्धा घडवून येत असते एवढेच नव्हे तर नाटक या सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून समाज प्रबोधन घडून येत असते त्यामुळेच नाटक हे मनोरंजनासह समाज प्रबोधनाचे एक प्रभावी माध्यम आहे. असे प्रतिपादन डॉ. सुगत चंद्रिकापुरे यांनी व्यक्त केले. ते तालुक्यातील तिडका येथे हनुमान सेवार्थ नाट्य मंडळाच्या वतीने मंडई निमित्त आयोजित बायको नंबर 1 या नाटकाच्या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी अध्यक्ष स्थानावरून बोलत होते.
उद्घाटन माजी जि. प. सभापती अशोक लंजे यांच्या हस्ते करण्यात आले. मंचावर माजी जी. प. सदस्य रमेश चुऱ्हे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती डॉ. अविनाश काशीवार, जि. प. सदस्य निशाताई तोडासे, प. स. सदस्य वर्षाताई शहारे, चेतन वडगाये, युवा काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष निशांत राऊत, सरपंच नितेश गुरनुले, राष्ट्रवादी काँग्रेस महिला अध्यक्ष रजनी गिरेपुंजे, संस्थापक रवींद्र पंचभाई, दुलाराम चंद्रिकापुरे, सौंदड येथील माजी सरपंच इरले, जि. प. शाळेचे मुख्याध्यापक मेश्राम, शिक्षक मस्के, तालुका कृषी अधिकारी पाठक, माजी सरपंच दुर्योधन गावतुरे, पोलीस पाटील जसवंत गावतुरे, पत्रकार बिरला गणवीर, शाहीद पटेल, ग्रामपंचायत उपसरपंच दुळीचंद तागडे, डॉ. यावलकर, समिती अध्यक्ष हरिश्चंद्र शेंडे, ग्रामसेवक पदा, ग्रामपंचायत सदस्य दिनेश पंचभाई, लखन गावतुरे, नीलू ताई गवतुरे, रीना बाई मोहूर्ले, निशाताई पेटकुले, हेमलता मोहूर्ले, मुक्ताबाई भोयर, हंसराज सोनुले, ताराम मौजे, सतीश पंचभाई छगन कावळे, आदी मान्यवर उपस्थित होते. संचालन विनोद कावडे यांनी केले.