नाना पटोले ओबीसींना विसरून त्यांच्या पोटावर लाथ मारण्याचं काम करतात : आशीष देशमुख


गोंदिया, दी. ०७ ऑक्टोबर : भाजपच्या वतीने ०२ ऑक्टोबरपासुन वर्धा जिल्ह्यातून ओबीसी जागर यात्रा काढण्यात आली असुन शुक्रवारी ०६ ऑक्टोबर रोजी ही यात्रा गोंदिया जिल्ह्यात पोचली. सर्वप्रथम गोंदिया शहरात यात्रा पोचल्यानंतर बाईक रॅली काढून यात्रेचे स्वागत करण्यात आले तर त्यानंतर गोंदिया शहरातील जलाराम लॉन येथे ओबीसी जागर सभेचे आयोजन करण्यात आले होते.



याप्रसंगी भाजपचे माजी आमदार आशिष देशमुख यांनी पत्रकारांशी संवाद साधताना कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर गंभीर आरोप लावले. एकेकाळी नाना पटोले यांचे अत्यंत निकटवर्तीय मानले जाणारे आशिष देशमुख यांनी चक्क नाना पटोले यांना ओबीसी विरोधी असल्याचे सांगत नाना पटोले हे ओबीसींच्या कुठल्याही आंदोलनात सहभागी झाले नाही, तसेच त्यांनी ओबीसींच्या पोटावर लाथ मारण्याचे काम केले आहे. असाही गंभीर आरोप देशमुख यांनी दरम्यान पत्रकरांशी बोलताना केल आहे.


 

Leave a Comment

और पढ़ें