तलाठी व कोतवाल 20 हजार रुपयाची लाच; प्रकरणी अडकले एसीबीच्या जाळ्यात!


गोंदिया, दी. 28 सप्टेंबर 2023 : तलाठी व कोतवाल लाच रक्कम स्वीकारल्या प्रकरणी एसीबीच्या जाळ्यात अडकले आहे. तक्रारदार महिला, वय 62 वर्ष, रा. गीधाडी, ता. गोरेगाव, असे असून आरोपी लोकसेवक 1) मधुकर नकटु टेम्भुर्णीकर वय 55 वर्ष धंदा नोकरी पद तलाठी त. सा. क्र : 13, गीधाडी, मंडळ कार्यालय मोहाडी, ता. गोरेगाव असे असून आरोपी 2) राकेश संपत वालदे वय 38 वर्ष पद कोतवाल, तलाठी कार्यालय गीधाडी रा. गीधाडी ता. गोरेगाव असे आहे. यांनी तक्रारदार यांच्याकडे 20 हजार रुपये लाचेची मागणी केली असून तडजोड अंती 18 हजार रुपये ची रक्कम स्वीकारली आहे.  आज दिनांक 28 सप्टेंबर रोजी सापळा कारवाई करण्यात आला आहे.

तक्रारदार महिला शेतकरी असून तक्रारदार यांचे पतीस ३ भाऊ व ४ विवाहित बहीणी आहेत. तक्रारदार यांच्या दिराचे लग्न झाले नसून तक्रारदार यांचे कडे राहत होते. त्यानी त्यांचे आजारपना मुळे त्यांची गीधाडी भु. क्र : 1 खा. क्र 357 मधे असलेली 1 हेक्टर शेती तक्रारदार यांचे नावाने मृत्यु पत्र लेखा अन्वये दी. 15,11, 2022 रोजी लिहून देऊन दुय्यम निबंधक कार्यालय गोरेगाव येथे दस्त क्र : 1676 प्रमाणे नोंदणी करुण दिली आहे.

तक्रारादार यांचे दिरा चे मृत्यु नंतर मृत्यु पत्रा नुसार दिराचे नावे असलेली जमीन तक्रारदार यांचे नावाने फेरफार होने करीता मार्च २०२३ मध्ये तलाठी कार्यालय येथे कागदपत्रे दिली. असता फेरफार करुण देने करीता आरोपी क्रमांक : 1 यांनी आरोपी क्रमांक 2 यांचे मार्फतीने 20 हजार रुपये लाच रकमेची पंचा समक्ष मागणी करुण तडजोडी अन्ती 18 हजार रुपयेची लाचेची मागणी करुण आरोपी क्रमांक : 2 यांनी आरोपी क्रमांक : 1 यांचे समक्ष लाच स्वीकारली. यातील दोन्ही आरोपी लोकसेवक यांनी आपल्या पदाचा दुरूपयोग करून स्वता:च्या लाभाकरीता गैर वाजवी फायदा मिळविण्याचा प्रयत्न केला. आरोपीस लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतले असून त्यांचे विरुद्ध पोलीस स्टेशन – गोरेगाव येथे गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरु आहे.

विलास काळे पोलीस उप अधीक्षक ला. प्र. वि. गोंदिया, यांच्या मार्गदर्शनात पो. नि. उमाकांत उगले, पोनी अतुल तवाड़े, स.फौ. विजय खोब्रागडे, चंद्रकांत करपे, पो. हवा. संजयकुमार बोहरे, मंगेश काहालकर, नापोशि, संतोष शेंडे, नापोशि संतोष बोपचे, अशोक कापसे, नापोशि प्रशांत सोनवाने, कैलाश काटकर, मनापोशी संगीता पटले, रोहिणी डांगे, चालक नापोशि दिपक बाटबर्वे यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.


 

Leave a Comment

और पढ़ें