- सौन्दड ते फुटाळा उड्डाण पुलाचे बांधकाम रखडले
- गेली दोन दिवसापासून महामार्ग जाम ?
सडक / अर्जुनी, ( बबलु मारवाडे ) दि, ०९ सप्टेंबर : नागपूर वरून रायपुर कडे जाणारे राष्ट्रीय महामार्ग क्रमाक : ५३ हे गोंदिया जिल्ह्याच्या सडक अर्जुनी तालुक्यातून गेले आहे. या मार्गावर गेली 2 ते 3 वर्षे पासून उड्डाण पुलाची निर्मिती करण्याचे काम सुरु आहे. सदर पुलाचे बांधकाम राजदीप बिल्डकॉम नामक कंपनी करीत आहे. पुलाच्या अगदी बाजूने वाहने जाण्यासाठी सर्विश रोड ची निर्मिती करन्यात आली आहे. मात्र या मार्गावर वाहनांची खूप वर्दळ अश्ल्याने मुख्य मार्गावर मोठे खड्डे पडले आहेत. त्या मुळे सदर मार्गावर सतत जाम लागला असते. अश्यात वाहन धारकांना रस्ता शोधत आपले वाहने काढावी लागत आहे. तब्बल 2 दिवसा पासून या मार्गावर वाहनांचा जाम लागला आहे.
अशी दयनीय परिस्थिती असताना देखील कंपनी कडून मार्गाची दुरुस्ती करण्यात आली नाही. त्या मुळे ग्राम फुटाळा येथील महिला सरपंच लता गहाने यांनी स्वत रस्ता दुरुस्त करण्यासाठी ०८ सप्टेंबर रोजी पुढाकार घेतला. व मार्गावरील खड्डे बुजविले. त्यातच आज दि. ०९ सप्टेंबर रोजी सौन्दड येथील सरपंच हर्ष मोदी यांचा नेतृत्वात राजदीप कंपनी च्या प्लांट वर मोर्चा नेण्यात आला.
यावेळी जि.प. सदस्य निशा तोडासे, फुटाळा ग्रा.प. येथील सरपंच लता गहाणे, सौन्दड ग्रा.प. चे उपसरपंच भाऊराव यावलकर, राहुल यावलकर सह गावकरी उपस्थित होते. तर राजदीप कंपनी चे अधिकारी अभिजीत धाडीवल आणि भांडार – गोंदिया जिल्ह्याचे खासदार सुनील मेंढे देखील यावेळी उपस्थित होते.
सौन्दड ते फुटाळा सर्व्हिस रोड चे काम येत्या 15 दिवसात करण्यात येईल असे लेखी आश्वासन संबधित अधिकारी यांनी दिले. त्या मुळे मोर्चा माघे घेण्यात आला. सरपंच हर्ष मोदी यांनी सांगितले की सदर महामार्गाच्या दुरुस्तिचे काम 15 दिवसात पूर्ण न झाल्यास कंपनी समोर भिख मांगो आंदोलन करण्यात येईल व याला जबाबदार कंपनी राहील.