कोहमारा येथे आवार भिंतीच्या कामाचे चे भूमिपूजन संपन्न


सडक अर्जुनी, दी. 23 : तालुक्यातील राष्ट्रीय महामार्ग क्र : 6 वरील कोहमारा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथील आवार भिंतीचे भूमिपूजन आज दि : 23 फेब्रुवारी रोज बुधवार ला सरपंचा वंदना थोटे यांच्या हस्ते संपन्न झाले. सदर आवार भिंतीचे काम आदिवासी उप योजना क्रीडा विभाग गोंदिया सण 2021-22 अंतर्गत मंजूर झाले आहे.

ही आवरभिंत चे काम 60 फूट लांब असून विद्यार्थ्यांसाठी सुरक्षित ठरणार आहे. या भूमिपूजन कार्यक्रमा प्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक जी. जे. कापगते, ग्रा. प. सदस्य दिनेश मसराम, सचीन टेम्भूर्णे, सरिता जनबंधू, शिक्षिका निशा भगत , शाळा व्यवस्थापन समिती चे अध्यक्ष प्रभा कटरे, सदस्य विद्या उंदीरवाडे, अंगणवाडी सेविका शालिनि राऊत तसेच पत्रकार अश्लेष माडे आदी मान्यवर उपस्थित होते.


 

Leave a Comment