गोंदिया विधानसभेत विजयी पताका रोवू – मा. आ. राजेन्द्र जैन

  • पांढराबोडी जिल्हा परिषद क्षेत्र पदाधिकारी, कार्यकर्ता बैठक संपन्न.

 गोंदिया, दि. 07 ऑक्टोंबर : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष गोंदिया तालुका पांढराबोडी जि.प., क्षेत्रातील पक्ष पदाधिकारी व कार्यकर्ताची संघटनात्मक बैठक श्री. रिताराम लील्हारे यांच्या निवासस्थानी माजी आमदार श्री. राजेंद्र जैन यांच्या प्रमूख उपस्थितीत 06 ऑक्टोंबर रोजी संपन्न झाली.

खासदार श्री. प्रफुल पटेलजी यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना बोनस देण्याचे काम केले आहे यावर्षी सुध्दा धानाला 25 हजार बोनस देण्याबाबत सरकारशी चर्चा केली आहे. महायुति सरकारने अनेक लोक कल्याणकारी योजना लागू केल्या आहेत. लाडली बहन योजनेला मोठा प्रतिसाद मिळत असून महिलांमध्ये उत्साह आहे.

माननीय श्री अजितदादा पवारजी यांनी आपला वादा निभावलं असून ऑक्टोबर व नोहेंबर महिन्याचे पैसे खात्यात येणे सूरू झाले आहे. सिंचन, आरोग्य, शिक्षण क्षेत्र, शेतकरी व शेतमजूर यांच्या विकासासाठी आगामी विधानसभा निवडणुकीत प्रफुल पटेलजी यांच्या निर्देशा नुसार गोंदिया विधानसभा क्षेत्रात उमेदवार निवडून आणण्याची जबाबदारी कार्यकर्त्यांना घ्यायची आहे. असे प्रतिपादन माजी आमदार श्री. राजेन्द्र जैन यांनी केले.

बैठकीला सर्वश्री राजेंद्रजी जैन, गणेश बरडे, छोटूभाऊ पटले, चंदन गजभिये, रवीकुमार पटले, रिताराम लिल्हारे, यशलाल पटले, चुन्नीलाल पटले, संजय कटरे, सूरजलाल पटले, श्यामलाल तेलासे, रविन्द्र पटले, महेन्द्र बिसेन, राजपाल मेश्राम, नंदकिशोर मेश्राम, राजू येडे, राजेंद्र गेड़ाम, सुनील पटले, शैलेश वासनिक, राजेंद्र सुलाखे, रौनक ठाकूर, रणजीत शेंडे, खेमलाल दमाहे, गणेश तुरकर, तीर्थराज नारनवरे, संदीप मेश्राम, रेखलालजी, जितेंद्र चुलपार, मुन्ना चुलपार, शैलेश चूलपार सह अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Comment

और पढ़ें