आ. विनोद अग्रवाल यांचे निलंबन मागे आज करणार भारतीय जनता पक्षात प्रवेश!

  • घर वापसी झालेले आजी माजी आमदार लढणार ऐक मेका विरुद्ध निवडणूक

गोंदिया, दि. 07 ऑक्टोंबर : भारतीय जनता पक्षाचे सदस्य राहिलेले विनोद अग्रवाल यांचे निलबंन मागे घेण्यात आले असल्याचा पत्र भारतीय जनता पक्षाचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी काढला असून त्यांच्या शह इत्तर १२ लोकांचे निलंबन देखील मागे घेण्यात आले आहे.

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत विनोद अग्रवाल यांनी भारतीय जनता पक्षाशी बंडखोरी करित अपक्ष विधानसभा निवडणुक लढवीत विजय मिळविला असल्याने भारतीय जनता पक्षाने त्यांच्या शहा इत्तर १२ लोकांना पक्षातून निष्काषित केले होते.

मात्र आगामी 2024 च्या विधानसभा निवडणूका पाहता गोंदिया विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार गोपालदास अग्रवाल यांनी भारतीय जनता पक्ष सोडत कॉग्रेस पक्षात घर वासपी केली तर दुरीकडे त्यांना गोंदिया विधानसभा निवडणूक लढण्याची संधी कॉग्रेस पक्ष देणार असल्याने आगामी विधानसभा निवडणूका पाहता भारतीय जनता पक्षाकडे गोंदिया विधानसभेत प्रबळ उमदेवार मिळत नसल्याने त्यांचा भारतीय जनता पक्षाने विनोद अग्रवाल यांची मनधरणी करण्यासाठी पक्षाचा निलंबन मागे घेण्यात आले असल्याचे बोलले जात आहे.

तर दुसरीकडे आमदार विनोद अग्रवाल यांनी लवकरच आपली भूमिका ठरविणार असल्याचे सांगितले आहे. अपक्ष आमदार विनोद अग्रवाल यांचा भारतीय जनता पक्षांने निलंबन मागे घेतला असून ते येत्या काही तासातच आपली भूमिका ठरविणार असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे आजी माजी आमदारांनी केलेली घर वापसी कोणत्या आमदाराला विधानसभेत पुन्हा निवडणून पाठविते हे येणाऱ्या काळात लवकरच कळेल.

Leave a Comment

और पढ़ें