ईजी. यशवंत गणविर यांच्या हस्ते गोठणगाव जि.प. क्षेत्रात विविध विकासकामांचे भूमिपूजन संपन्न.

अर्जुनी मोरगाव, दि. 07 ऑक्टोंबर : गोठणगाव जिल्हा परिषद क्षेत्रातील विविध विकासकामांचे भूमिपूजन जिल्हा परिषद उपाध्यक्ष तथा सभापती शिक्षण क्रीडा व आरोग्य इंजि यशवंत गणविर यांच्या हस्ते 06 ऑक्टोंबर रोजी संपन्न झाले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष तथा माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल यांच्या कार्यप्रणालीवर व माजी आमदार राजेंद्र जैन यांच्या मार्गदर्शनाखाली गोठणगाव जिल्हा परिषद क्षेत्रातील विकास कामांना गती मिळाली आहे.

गोंदिया जिल्ह्याच्या विकासासाठी सदैव तत्पर असणारे आदरणीय श्री. प्रफुल्ल पटेल व माजी आमदार राजेंद्र जैन यांच्या पावलावर पाऊल ठेवत हि विकास कामे खेचुन आणण्याची क्षमता मी स्वतः मध्ये निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. माझा क्षेत्र जिल्हा निर्माण झाला तेव्हा पासून विकासापासून वंचित आहे. म्हणून क्षेत्रातील कामांना प्राथमिकता देऊन क्षेत्र सुजलाम सुफलाम करण्यासाठी नेहमी प्रयत्नशील आहे, अशी ग्वाही भुमिपुजन सोहळ्याप्रसंगी इजी. गणवीर यांनी दिली.

मौजा गोठणगाव येथे दलित वस्ती सुधार योजना अंतर्गत सिमेंट रस्ता बांधकाम ४.०० लक्ष रु, मौजा तुकुमनारायण येथे दलित वस्ती सुधार योजना अंतर्गत सिमेंट रस्ता बांधकाम ५.०० लक्ष रु, दलित वस्ती सुधार योजना अंतर्गत सिमेंट नाली बांधकाम ५.०० लक्ष रु, १५ वा वित्त आयोग जिल्हा स्तर सिमेंट रस्ता बांधकाम ५.०० लक्ष रु, १५ वा वित्त आयोग जिल्हा स्तर सिमेंट नाली बांधकाम ४.०० लक्ष रु, मौजा उमरपायली येथे सभामंडप दुरुस्ती ४.०० लक्ष रु, मौजा गवर्रा येथे दलित वस्ती सुधार योजना अंतर्गत आवारभिंत बांधकाम ५.०० रू, अशा विविध विकासकामांचे भूमिपूजन संपन्न झाले.

सदर भुमिपुजन सोहळ्याप्रसंगी आम्रपाली डोंगरवार पं.स.सदस्या, उपसरपंच कांतीलाल डोंगरवार, सौरभ पशिने, इंजि. जगदिश पंधरे, विवेक कापगते, विश्वनाथ कोवे, जोशी डोंगरवार, नेपाल डोंगरवार, नंदन जुगनाके, दिपक डोंगरवार, रतिराम कोडापे ग्रामपंचायत सदस्य, खेमराज रामटेके, मशीकला गेडाम, सरपंच नरेंद्र लोथे, उपसरपंच सचिन साखरे, टिकाराम नंदेश्वर, गजानन कोवे, धनराज कानेकर, मंगेश कानेकर, मंदाताई मडावी, महादेव उईके, प्रज्ञा कानेकर, रमेश उईके तथा गावकरी उपस्थित होते.

Leave a Comment

और पढ़ें