राष्ट्रीय महामार्गावर लुटमार करणारी आंतर राज्यीय टोळी पोलिसांच्या ताब्यात!

सडक अर्जुनी, दि. 07 ऑक्टोंबर : गोंदिया जिल्यातून जाणाऱ्या मुबई हावडा राष्ट्रीय महामार्गावर ट्रक चालकांना थांबवत त्याना धमकावून ट्रक मधून डिझेल चोरी करणाऱ्या आंतर राजीय टोळीच्या दोन लोकांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक करीत त्यांच्या कडून 56 लक्ष 14 हजार 900 रुपयांचा मुद्दे माल जप्त केला आहे.

ट्रक चालक प्रदीप यादव हा भारत बेंज कंपनीचा ट्रक गडचिरोली जिल्याच्या सुरजागड पहाडी वरून आयरन मिटटी रायपूर येथे घेउन जात असताना रात्रीच्या सुमारास नॅशनल हायवे 53 वरील कोहमारा गावा जवळील आराध्य पेट्रोल पंप जवळ नैनपूर येथे थांबला असताना 20 ते 25 वर्षे वयोगटातील 4 अनओळखी आरोपीनी पांढऱ्या रंगाच्या बोलेरो गाडीने ट्रक जवळ येऊन ट्रकवर चढून चालकास धमकावून शिवीगाळ करून व इतर आरोपीने ट्रक च्या डिझेल ट्यांक मधुन अंदाजे 175 लिटर डिझेल काढून नेल्याची तक्रार ट्रक चालकाने डुगीपार पोलिसात केली होती.

पोलिसांनी तापास चक्रे फिरवत आरोपी 19 वर्षीय हिमांशु विश्वकर्मा, 27 वर्षीय सलमान बशीर खान दोन्ही राहणार मंडला मध्यप्रदेश यांना अटक केली असून दोघांनी त्यांचे ईतर 5 साथीदार यांचेसह मिळुन गुन्हा केल्याचे कबूल करून सांगितले असता दोन्ही आरोपीच्या ताब्यातून गुन्ह्यात वापरलेल्या दोन इनोव्हा चारचाकी गाड्या व डीझेल विक्रीचे पैसे, व इतर साहित्य असा एकूण किंमती 56 लक्ष 14 हजार 900 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केले आहे.

Leave a Comment

और पढ़ें