अर्जुनी मोरगाव, दी. 29 जानेवारी : “शेतकऱ्यांची रब्बी धानाची लागवड होई पर्यंत रोजगार हमी चे काम थांबवा” असा आसयाचे निवेदन विविध कार्यकारी सेवा सहकारी संघ अर्जुनी मोरगाव चे अध्यक्ष ललित बाळबुध्दे यांच्या शिस्ठ मंडळाले दिनांक 28 जानेवारी रोजी स्थानिक तहसीलदार यांना भेटून दिले आहे. अर्जुनी मोर., तालुक्यात धान उत्पादक शेतकरी रब्बी धानाची लागवड करीत असल्याने रोजगार हमी योजनेचे काम 30 ते 40 दिवस बंद ठेवण्यात यावे असे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. अर्जुनी मोर. तालुक्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांनी रब्बी धानाची ( भात पेरणी ) लागवड सुरु केली आहे. ईटियाडोह कालव्याच्या पाण्याचा वापर करून लागवट सुरु केली आहे, यात काही शेतकऱ्यांनी तलावांच्या पाण्याचा वापर केला असून, बोरवेलच्या पाण्याचा देखील वापर करून धान लागवड सुरू केली आहे.
तालुक्यात शेतमजुरांची संख्या बघता धान उत्पादक शेतकऱ्यांना शेतमजुरांचा तुटवडा पडत आहे, त्या मुळे शेतकरी बांधवांचे रब्बी हंगामाचे नियोजन बिघडू नये, अनेक वेळा शेतकऱ्यांना मजूर मिळत नाही, मजूर मिळत नसल्यास अतिरिक्त मजुरी वाढून द्यावा लागतो, त्या मुळे शेतकऱ्यांवर अतिरिक्त भार वाढतो, मजूर मिळत नसल्याने शेतीचे कामे रखडतात, आदी शेतीचे कामे आटोपून मग रोजगार हमी च्या कामाला सुरवात करावी त्या साठी 30 ते 40 दिवस तालुक्यात रोजगार हमीचे काम बंद ठेवावे, शेतकऱ्यांच्या अडचणी लक्ष्यात घेता विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था संघ तालुका अर्जुनी मोरगांव चे तालुका अध्यक्ष ललीतकुमार वा. बाळबुद्धे उपाध्यक्ष सुभाष देशमुख, सचिव अरुण गजापुरे यांच्या सिस्ठ मंडळाने निवेदन दिले आहे.