सडक अर्जुनी, दिनांक : 26 सप्टेंबर 2024 : सडक अर्जुनी तालुक्यातील ग्राम सौंदड येथे एका वयोवृद्ध व्यक्तीने एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सदर प्रकरणातील आरोपी सुरेश हरणे वय वर्षे 61 मु. सौंदड, असे असून घटना दि. 24 सप्टेंबर रोजी सकाळी 10 वाजता दरम्यान घडली आहे.
आरोपी हे तक्रारदार यांच्या घरा शेजारी राहतात, दरम्यान इमारतीवर बंदर आहेत, त्यांना हाकलण्याच्या बहाण्याने तक्रारदार यांच्या घरात शिरला व आरोपी यांनी घरात असलेल्या अल्पवईन मुलीची छेड काढून तिचा विनयभंग केला, तक्रारदार ही अल्पवईन मुलगी आरडा ओरड करीत घराबाहेर निघाली, पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार तक्रारदार मुलगी वय वर्षे अंदाजे 16 ही सौंदड येथे एका शाळेत शिक्षण घेण्यासाठी किरायाच्या घर घेऊन आरोपी यांच्या घरा शेजारी राहते, बी.एन.एस. कलम 75 (2) 332 (सी) पोस्को कलम 8 अन्वय डुग्गीपार पोलीस स्टेशन येथे गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
आरोपी सुरेश हरणे यांना 24 रोजी च्या रात्री पोलिसांनी अटक केली असून 25 रोजी गोंदिया येथील जिल्हा सत्र न्यायालयासमोर हजर केले आसता मा. न्यायालयाने आरोपी याला भंडार जेल येथे 8 ऑक्टोंबर पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. सदर घटनेचा तपास ए.पी. आय. बांबोडे करीत आहेत. देशात अश्या अनेक प्रकारामुळे सध्या वातावरण तापलेले असताना ही बातमी समोर आल्याने सर्वच स्तरातून संताप वेक्त होत आहे.