गोंदिया जिल्हयाचा विकास थांबवण्याचा काम एका नेत्यांनी केल, प्रफुल पटेल यांच नाव न घेता नाना पटोले यांचा टोला.

  • विकासाच्या मुद्द्याला घेऊन आपला घर सोडून गेलो : गोपाल अग्रवाल.

गोंदिया, दि. 13 सप्टेंबर : माजी आमदार गोपालदास अग्रवाल यांचे पक्ष प्रवेश निमित्याने काँग्रेस पक्षाचे शक्ती प्रदर्शन गोंदिया येथील सर्कस ग्राउंड येथे आज दि. 13 सप्टेंबर रोजी आयोजिन करण्यात आले होते, दरम्यान मंचावर रमेश चेंन्नीथला केंद्रीय सचिव काँग्रेस, काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले, विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार, पृथ्वीराज चव्हाण माजी मुख्यमंत्री, सुनील केदार माजी मंत्री, खासदार प्रशांत पडोळे, खासदर डॉ. नामदेवराव किरसान, नितीन राऊत माजी मंत्री, आमदार सहसराम कोरोटे, गोपाल अग्रवाल माजी आमदार, सह अन्य मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते, दरम्यान उपस्थित पाहुण्यांचे शाल पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आले, यावेळी मंचावरून उपस्थित पाहुण्यांनी भाजप अक्षावर निशाणा साधत अनेक टीका केल्या.

गोंदिया जिल्हयाचा विकास थांबवण्याचा काम एका नेत्यांनी केलं : नाना पटोले, काँग्रेस प्रदेशध्यक्ष.

गोंदिया जिल्हा हा काँग्रेसच्या सामान्य कार्यकर्त्याचा आहे, महाराष्ट्रात अशी परिस्थीती होती की काँगेस चौथ्या क्रमांकाची पार्टी होती असे बोलत ते पुढे म्हणाले, उलटा चोर कोतवालको दाटे, पिक विमा कंपनी मोदीच्या मित्रांच्या आहेत, म्हणून शेतकऱ्यांना पिक विमा मिळतं नाही, भंडारा गोंदिया जिल्ह्यात सात ही सिटा आम्ही जिंकु, महाराष्ट्रात महाविकास आघाडीची सत्ता येणार, गोंदिया जिल्हयाचा विकास थांबवण्याचा काम एका नेत्यांनी केलं नाव न घेता प्रफुल्ल पटेल यांच्यावर टोला लगावला असून ते पुढे म्हणाले, महाराष्ट्रात रस्त्यांच्या नावावर खड्डेच खड्डे आहेत.

विकासाच्या मुद्द्याला घेऊन आपला घर सोडून गेलो : गोपाल अग्रवाल

दरम्यान मंचावरून बोलतना माजी आमदार गोपालदास अग्रवाल म्हणाले की मी विकासाच्या मुद्द्याला घेउन आपला घर सोडून गेलो, मी सर्व जनतेची माफी मागतो, काँगेस सोडली पण माझ्या आधी नाना भाऊंनी काँग्रेस सोडली होती, तेव्हा मी काँगेस सांभाळली असे ही त्यांनी मंचावरून बोलताना आपले मत वेक्त केले.

 

महाराष्ट्रात महाविकास आघाडीची सत्ता येणार : विजय वडेट्टीवार, विरोधी पक्ष नेते

महाराष्ट्राच्या सत्तेत गोंदिया जिल्ह्याचा वाटा असेल, टिव्ही वर पाहिलो तिघांचे चेहरे पडले आहेत, सर्वे वर सर्वे करीत आहेत, पहिली बारी अजित पवारांची तर दुसरी बारी एकनाथ शिंदे ची आहे, आम्ही कामाची चर्चा करतो ते रामाची चर्चा करतात, जिथं जिथं गेले रामाच नाव घेतलं, तिथे तिथे जिरवली, हनुमानानी पाठीवर गधा मारला व संपुर्ण पाठ लाल केली, महाराष्ट्रात महाविकास आघाडीची सत्ता येणार, ही काळ्या दगळा वरची पांढरी रेख आहे, जेवढ्या राहूल गांधीच्या सभा लावु तेथे तेथे काँगेसची सत्ता येणार असून 100 च्या वर आमचे उमेदवार निवडूण येतील असेही विजय वडेट्टीवार म्हणाले.

नाना भाऊच्या नेतृत्वात महाराष्ट्रात काँग्रेस नंबर एक पक्ष बनेल : रमेश चेन्नीथला, काँग्रेस प्रदेश सचिव

राहूल गांधीच्या अस्तित्वाला संपवायच काम भाजपने केला आहे, सुप्रीम कोर्टाची प्रतीमा संपवण्याचा काम प्रधानमन्त्री करीत आहेत, संविधान संपवण्याचा काम देखिल केला जात आहे, नाना भाऊच्या नेतृत्वात महाराष्ट्रात काँग्रेस नंबर एक पक्ष बनेल आहे, येणाऱ्या निवडणुकीत नाना पटोले यांच्या नेतृत्वात महाविकास आघाडीला जिंकून द्या अशी अपेक्षा आहे.

महाराष्ट्राचे पुढचे मुख्यमंत्री नाना पटोले : प्रशांत पडोळे, खासदार

नाना पटोले यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रात महाविकास आघाडीची सत्ता येणार आहे. आणि नाना पटोले यांना मुख्यमंत्री बनवायचं आहे. असे वक्तव्य भंडारा गोंदिया जिल्ह्याचे खासदार प्रशांत पडोळे यांनी केलं आहे.

 

Leave a Comment

और पढ़ें