खजरी ते मसवानी मार्गावरील नवीन पुल पाण्याखाली, तालुक्याचा संपर्क तुटला

  • गोंदिया ते सडक अर्जुनी मार्ग सकाळ पासून बंद, शेकडो हेक्टर शेती पान्याखाली. 

गोंदिया, ( बबलू मारवाडे ) दि. 10 सप्टेंबर : जिल्ह्याच्या सडक अर्जुनी तालुक्या अंतर्गत येत असलेले ग्राम खजरी ते मसवानी, खोडशीवनी, घोटी या गावाकडे जाणार्या मार्गावरील पुल सध्या  पाण्याखाली गेल्याने वाहतूक खोळंबली आहे, नुकतेच या मार्गावर पुलाचे नव निर्माण कार्य करण्यात आले आहे, पुल निर्माण झाल्या पासून हा पहिलाच पुर आला आणि पुल पाण्याखाली गेल्याने वाहन धारकांची कोंडी झाली आहे, या पूर्वी देखील या मार्गावर लहान पुल होते, पावसाळ्यात सदर पुलावर पाणी राहत असल्याने सदर मार्ग संपूर्ण बंद राहत होते, परिणामी मसवानी, खोडशिवणी, घोटी सह अन्य गावांचा सडक अर्जुनी तालुका मुख्यालयाशी संपर्क तुटत होता.

नागरिकांच्या समस्यांना लक्ष्यात घेता अर्जुनी मोर विधान सभा क्षेत्राचे आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांनी मसवानी मार्गावर नवीन पुलाची निर्मिती केली या मागील उद्देश म्हणजे पावसाळ्यात शेतकऱ्यांचा व नागरिकांचा संपर्क तालुका मुख्यालयाशी जोडला रहावा असा होता, मात्र पहिल्याच पुराणे सदर पुल पान्याखाली गेल्याने सदर मार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद पडली होती. त्या मुळे या पूलाचा पाहिजे तसा उपयोग होत नशल्याने परिसरातील नागरिकांची नाराजी आहे. पूलाची ऊंची अधिक वाढली असती तर भर पावसाळ्यात नागरिकांचा मार्ग सुरू राहिला असता, विशेष सांगायच म्हणजे या भागात 7 ते 8 नवीन पूलांची निर्मिती करण्यात आली आहे.

  • गोंदिया ते सडक अर्जुनी मार्ग सकाळ पासून बंद

आज दी. 10 सप्टेंबर रोजी रात्री पासून तालुक्यात आणि जिल्ह्यात दमदार पावसाने हजेरी लावली असल्याने गोंदिया ते सडक अर्जुनी हा मार्ग आज सकाळ पासून बंद होता, या मार्गावरील डव्वा जवळील नाल्याला भरपूर पुर असल्याने सदर मार्ग पूर्णपणे बंद होता, गेली 2 किमी पर्यंत वाहनांची रांग लागल्या होत्या तर दुसरीकडे कोहमारा ते सडक अर्जुनी मार्गावर मोठ्या प्रमाणात पाणी वाहत होते, सौंदड ते राका मार्ग संपूर्ण बंद होते कारण या मार्गावरील चुलबंद नदीला पूर आल्याने पुलावरून पाणी वाहत होते परिणामी राका, पळसगाव, चिखली, कणेरी, मनेरी कडे जानार्या नागरिकांना तब्बल 12 किमी अंतर लांबून जावे लागले, या मार्गावर उंच व पक्क्या पूलाची आवश्यकता आहे, एकीकडे या भागात नवीन पुलांची निर्मिती करण्याची आवश्यकता आहे, तर ज्या ठिकाणी नदी व नाल्यांवर पुलांची निर्मिती झाली असली तरी पाहिजे त्या प्रमाणात उंची वाढविण्यात आली नाही, परिणामी नवं निर्मित पुल सध्या पाण्याखाली आहेत, त्या मुळे अनेक मार्ग वाहतुकीसाठी बंद होते.

  • शेकडो हेक्टर शेती सध्या पान्याखाली, पंचनामे कधी होणार ? 

सडक अर्जुनी तालुक्यातील शेकडो हेक्टर शेती सध्या पान्याखाली आहे, तालुक्यात अनेक नदी व नाले आहेत ते पावसामुळे तुडुंब भरून वाहत आहेत, तर त्याची थोप शेती मध्ये थांबलेली आहे, त्या मुळे शेतीत थांबलेले पानी पेरलेल्या धान पिकाला धोकादायक आहे, सध्या धानपीक पान्याखाली अशल्याने धानपीक सडण्याची सक्यता नाकारता येणार नाही, परिणामी शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची वेळ येणार की काय ? असा प्रशन शेतकरी राज्याला पडला आहे, 09 सप्टेंबर पासून पावसाने दमदार हजेरी लावल्याने अनेकांचे घर पडले आहेत, अश्यात पडलेल्या घरांची व शेतीची झालेली नुकसान त्याचे पंचनामे प्रशासनाने करावे अशी मागणी होत आहे.

Leave a Comment

और पढ़ें