चुटीया व रापेवाडा येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची सभा संपन्न

गोंदिया, दी. 10 सप्टेंबर : गोंदिया तालुका फुलचूर जिल्हा परीषद क्षेत्रातील श्री प्रभु पटले यांचे निवास स्थान, चुटिया व श्री रमेश रहांगडाले यांचे निवास स्थान, रापेवाडा येथे पक्ष पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक माजी आमदार श्री राजेंद्र जैन यांच्या प्रमूख उपस्थितीत संपन्न झाली. यावेळी क्षेत्रातील नागरिक व कार्यकर्त्याकडून अडी – अडचणी व समस्या जाणून घेतल्या व विघ्नहर्ता श्री गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा दिल्या.

राज्यातील महायुतीची सरकार सर्वसामान्य जनतेच्या हिताचे कार्य करणारी आहे. खा. श्री प्रफुल पटेलजी सदैव जनतेच्या हिताचे काम करीत असून शेतकऱ्यांना मागील काळात बोनस मिळवून देण्यात मोलाची भूमिका होती या वर्षी सुद्धा 25 हजार रुपये बोनस शेतकऱ्यांना देण्यात यावे यासाठी सरकारशी खा. श्री प्रफुल पटेल यांनी चर्चा केली आहे. महायुती सरकारने महिला, युवक, ज्येष्ठ नागरिक तसेच मुलींना निःशुल्क उच्च व्यावसायिक शिक्षण असे अनेक जनहितकारी व सामाजिक परिवर्तन घडवून आणणारे निर्णय घेतले आहे. लाडली बहिण योजनेच्या माध्यमातुन माता भगिनींच्या खात्यात पैसे जमा होणे सुरू झाले आहे. याबाबतीत सुध्दा विरोधक भ्रम निर्माण करून अफवा पसरविण्याचे काम करीत आहेत असे प्रतिपादन माजी आमदार श्री राजेंद्र जैन यांनी केले.

यावेळी सर्वश्री राजेंद्र जैन, पूजा अखिलेश सेठ, केवलभाऊ बघेले, कीर्ती पटले, निरज उपवंशी, शंकरलाल टेंभरे, सुनील पटले, आकाश पारधी, रौनक ठाकुर, प्रभुदास पटले, राजेश रहांगडाले, एन डी रहांगडाले, बळवंत चौधरी, रमेश पटले, लक्ष्मी तुरकर शालिकराम पटले, खुशाल वैद्य, शिशुपाल ठेंगरे, शैलेश वासनिक, देवेंद्र टेंभरे, हौसलाल रहांगडाले, माणिकचंद पारधी, भोजराज रहांगडाले, प्रमोद रहांगडाले, मोरेश्वर ठाकुर, अनिल मोहबे, कार्तिक राम चौधरी, हिरालाल रहांगडाले, हिरामण येडे, धर्मराज रहांगडाले, वर्षा रहांगडाले, दिव्या रहांगडाले, रमेश रहांगडाले, यशस्वी रहांगडाले, राधेलाल रहांगडाले, दिलीप मौजे, ओवेश टेंभरे, झुलाबाई रहांगडाले, देवला बाई रहांगडाले, मिलिंद पारधी, ब्रिजलाल येडे, पुरुषोत्तम नेवारे, संतोष रहांगडाले, नानू पटले, दीपक पटले, कलस हरिणखेडे, महेंद्र कटरे, दिलीप पटले, डोमाजी कटरे, सुनील तुरकर, डिलेश्वरी पटले, डीलेनताई पटले, अमृता ताई, सोमेश्वरी पटले, कांताबाई पटले, टिकेश्वरी पटले, दिलीप टेंभरे, अभिषेक नेवारे, सुभाष तुरकर, राहुल येलसरे, दीपक कोसरे, पंकज कोसरे, निखिल पटले, हर्षद रहांगडाले सहित मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ता उपस्थित होते.

Leave a Comment

और पढ़ें