आ. चंद्रिकापुरे यांच्या हस्ते गोठणगाव येथे महिला प्रभाग संघ बांधकामाचे भूमिपूजन

अर्जुनी मोर., दि. 31 ऑगस्ट : अर्जुनी मोरगाव विधानसभा मतदार संघात आमदार मनोहर चांद्रिकपुरे याचे प्रयत्नाने एकूण 15 महिला प्रभाग संघ भवन बांधकामासाठी निधी मंजूर करण्यात आला. त्यानुरूप 15 लक्ष रुपयाचे मंजूर निधीतून अर्जुनी मोरगाव तालुक्यातील गोठनगाव येथे महिला प्रभाग संघ भवन बांधकामाचे भूमिपूजन आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांचे हस्ते करण्यात आले.

बचत गटाच्या माध्यमातून महिलांनी मोठ्या उद्योगाकडे लक्ष केंद्रित करून पुढील वाटचाल करावी. आर्थिक दृष्ट्या महिला सक्षम होणे गरजेचे आहे. त्यासाठी महिलांनी एकत्र येणे गरजेचे आहे .असे मनोगत आमदार मनोहर चांद्रिकापुरे यांनी व्यक्त केले. यावेळी प्रामुख्याने

जी. प. उपाध्यक्ष इंजी. यशवंत गणवीर, तालुका अध्यक्ष लोकपाल गहाने, महिला तालुका अध्यक्ष सुशीला हलमारे, डॉ. सुगत चंद्रिकापुरे, पंचायत समिती सदस्य आम्रपाली डोंगरवार, माजी जी प.सदस्य रतिराम राणे, उद्वव मेहंदळे, सोनिया वाढई महिला प्रभाग अध्यक्ष नागपुरे, प्रभाग संघ चे शालू हटवार, मालता गावड, अल्का मांडवे, पुष्पा कोल्हे हिरकन्या गेडाम, मंजुषा कापगते, लता पंधरे, सुरेखा कापगते , मंजु शेंडे, जसुका मडावी, आरती मंडल, मंजुषा हलमारे, विमल बडोले, कविता लाडे, उमिता उके, सुनंदा पुराम, माधुरी परशुरामकर, रेखा चौबे, प्रमिला किरसान, गीता चौबे, वंदना इस्कपे, कल्पना बर्वे, हिमकला मेश्राम, भरती सोनवा, प्रमिला मानकर, नलिनी संय्याम, शीला राऊत, यांचे सह शेकडो महिलांची उपस्थिती होती.

Leave a Comment

और पढ़ें