राज्यातील प्रशासनाचा धाक नसल्यामुळे घडतात कोलकाता आणि बदलापुर सारख्या घटना : राज ठाकरे

  • गोंदियात मनसे चा जिल्हा पदाधिकारी मेळावा.

गोंदिया, दि.22 ऑगस्ट : मी नेहमी आपल्या संबोधनात सांगत असतो की छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील शासन व्यवस्था कश्या प्रकारे कार्य करित असे आज महाराज असतांना अश्या प्रकारे घटना घडल्या असत्या तर गुन्हेगारांच्या पायाखालचे चौरंग काढून घेण्यात आले असते पण अश्या प्रशासनाची अंमलबजावणीच कुठे ही होतांना मला दिसत नाही. मुळात आज प्रशासनाचा धाकच गुन्हेगारावर राहिलेला नाही त्यामुळेच प. बंगालच्या कोलकाता आणि महाराष्ट्रातील बदलापुर, आकोला सारख्या घटतांना दिसतात, पुरोगामी महाराष्ट्रात अश्या घटना ही येथील प्रशासनाला लाजिरवाणी बाब असल्याचे वक्तव्य महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गोंदियात मनसे पदाधिका-यांना संबोधित करतांना व्यक्त केले.

या प्रसंगी व्यासपीठावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे, अमित ठाकरे, गोंदिया जिल्हा संगठक रितेश गर्ग, गोंदिया जिल्हाध्यक्ष मनिष चौरागडे, मन्नु लिल्हारे, तालुका अध्यक्ष मुकेश मिश्रा आदि उपस्थित होते. पुढे राज ठाकरे म्हणाले की प्रशासनाच्या अश्या गळचेपी भूमिकेमुळेच येथील पोलिसांना पण आपले काम मनमोकळेपणाने करण्याची सुट राहिलेली नाही, यांनी इतका दबाव पोलिसांवर निर्माण केलं आहे की पोलिसांना ही वाटतं की काही कमी जास्त झालं की बळी आपलच जाणार प्रशासन आपले हात वर करणार त्यामुळे यांच्या या अश्या कारभारामुळे पोलिसांचे हात बांधले गेले आहे.

माझे तर येथे उपस्थित पोलिसांना पण म्हणणे आहे की दया एकदा माझया हातात सत्ता मग दाखवितो की कसे शासन प्रशासन चालविला जाते. यांच्या अश्या निगरगट्ट प्रशासनामुळे संपूर्ण देशात महाराष्ट्राची बदनामी होत आहे. पण येथील शासनाला याचं काहीही सोयरसुतक राहिलेला नाही असे दिसतो आहे. एक एसआयटी नेमून दिली, जलदगती न्यायालयात प्रकरण दाखल केले की झाले मोकळे अश्या प्रकारे शासन व्यवस्था चालतो का असा प्रश्न ही राज ठाकरे यांनी महाराष्ट्रातील मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना उद्देशून या प्रसंगी विचारला. आज महाराष्ट्रातील राजकारणाचा काय विचका करून ठेवलंय, एका एका आमदारांवर ५० खोके घेवून स्वतःला विकल्या गेल्याचे आरोप होतोय, असं महाराष्ट्रात या पूर्वी कधीच ऐकायला मिळत नव्हते पण आज हे सगळं सर्रास सुरू आहे.

मनसेच्या जिल्हा पदाधिका-यांच्या घेतल्या कानपिचक्या

पुढे आपल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिका-यांना संबोधित करतांना राज ठाकरे म्हणाले आज महाविकास आघाडी आणि महायुती या दोघांचे शासन जनतेनी पाहिलेले आहे. आणि आज जनता बदल म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडे आशेचा किरण म्हणून बघत आहे. कोणताही पक्ष सुरूवातील लहानच असतो तो प्रस्थापितांशी लढूनच वर येतो. स्वातंत्र्य नंतर देशात फक्त कॉग्रेस पक्ष होता प्रस्थापित होता. त्याविरूद्ध लढूनच इतर पक्षांनी आपली वाटचाल सुरू केली आणि बळकट झालेले आहेत. इतर झाले तसेच आपल्याला पण आजचे प्रस्थापितांविरूद्ध लढूनच पुढे यावे लागणार आहे. कुणी संधी देणार नाही संधी हेरून घ्यावी लागणार आहे. याकरिता पक्षाचा संगठनात्मक गाबा म्हणजेच की शेवटच्या माणसांपर्यंत स्थानिक जिल्हातील पदाधिका-यांनी पोहचणे गरजेचे आहे.

ते गेल्या १९ वर्षात या जिल्ह्यात झालेले असल्याचे मला दिसून येत नाही. पुढील दोन महिण्यात येथील जिल्हाअध्यक्ष, तालुका अध्यक्ष, शहर अध्यक्ष, शाखा अध्यक्ष, गट अध्यक्ष इथ पर्यंत तुमची यंत्रणा गेलेली मला दिसून आली तरच मी गोंदिया जिल्हयातील चार ही विधानसभा लढवणार, नाही तर इतर पक्षांकडून सेटिंग करून पैसे कमवायला मी निवडणूकीची तिकिट देणार नाही. पुढील महिण्यात पक्षातील इतर पदाधिकारी तुम्ही केलेली पक्ष बांधणी बघायला येणार प्रत्येक नियुक्त केलेला माणून प्रत्यक्ष दाखवावे लागणार यातून मला समाधान झाले तरच पुढची वाटचाल सोईस्कर रित्या करता येणार असल्याचेही राज ठाकरे पक्ष पदाधिका-यांना संबोधित करतांना म्हणाले.

मनसे पदाधिका-यांना दिला कानमंत्र

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे विचार गोंदिया जिल्हयातील गावोगावी, घराघरापर्यंत पोहचविण्याकरिता प्रत्येक मनसैनिकांनी आजपासूनच सज्ज व्हावे लागणार आहे. पुढील १५ नोव्हेंबर पर्यंत निवडणूका अपेक्षित असल्यामुळे वेळ कमी उरलेला आहे. पण या कमी वेळातच अधिक गतीमानपणे प्रत्येक मनसैनिकाला धाव घ्यावी लागणार आाहे. आपण पुढील दोन महिण्यात केलेली कर्तबगारीमुळे आपण यशापर्यंत जरी पोहचलो नाही तर जवळपास तरी पोहचू असा विश्वास व्यक्त करित महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे विचार गोंदिया जिल्हयातील घराघरापर्यंत पोहचवा असे आवाहन गोंदिया जिल्हयातील पदाधिका-यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी या प्रसंगी केले.

पक्षाची निष्ठा आणि राज ठाकरे सोबत व्यासपीठ मिळाले हे माझे सौभाग्य : मनीष चौरागडे

गेल्या २० वर्षापासून म्हणजेच अगदी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पक्ष स्थापन पासून मी निष्ठेने पक्षाशी जुळून आहे. त्यामुळेच मला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष पद मिळाले आणि आज राज ठाकरे सोबत व्यासपीठावर उपस्थिती ही मी माझे सौभाग्य समजतो अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष मनीष चौरागडे यांनी दिली.

Leave a Comment

और पढ़ें