सडक अर्जुनी, दि. २९ जुलै : तालुक्यातील ग्राम कोयलारी गावाला रा. का. शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हा कार्याध्यक्ष मिथुन मेश्राम यांनी दि.२६ जुलै रोजी भेट दिली असता, तेथील नागरिकांनी गावातील समस्यांच्या पेटारा उघडून, अंगणवाडी इमारतीची मुख्य समस्या समोर मांडली. ही बाब ग्रामपंचायत सरपंच रजनीकांत वालदे तसेच ग्रामसेवक कापगते यांना अंगणवाडीसाठी व्यवस्था करून देण्यात यावी असे सांगितले.
तसेच बालकल्याण अधिकारी संजय गणवीर यांच्याशी भ्रमणध्वनी वरून नवीन अंगणवाडीच्या प्रस्ताव तयार करण्यास सांगितले. अंगणवाडी हा भारतातील ग्रामीण बाल संगोपन केंद्राचा एक प्रकार आहे. बालकांची भूक आणि कुपोषणाचा सामना करण्यासाठी एकात्मिक बाल विकास सेवा कार्यक्रमाचा भाग म्हणून भारत सरकारने १९७५ मध्ये याची सुरुवात केली होती. अंगणवाडीचा अर्थ ‘अंगण निवारा’ असा होतो. नावाप्रमाणेच अंगणवाडी हे एक केंद्र आहे.
अंगणवाडी केंद्र पगारदार अंगणवाडी सेविका चालवितात. आणि अंगणवाडी मदतनीस त्यांना मदत करतात. अंगणवाडी केंद्र स्थापन करण्यासाठी सर्वसाधारण मार्गदर्शक तत्वे लोकसंख्येच्या निकषावर आधारित आहेत. ह्यात महिला आणि बालकांच्या सर्वांगीण विकासावर अधिक भर दिला जातो. ३ ते ६ वर्ष वयोगटातील बालकांना पूर्व माध्यमिक शिक्षण देणे तसेच माता, पालक यांच्या आरोग्य, आहार, कुपोषण या अन्य बाबीकडे लक्ष पुरवणे अशा कार्याच्या समावेश अंगणवाडीमध्ये होतो.
ह्याशिवाय पालकांना वेळोवेळी मार्गदर्शन करणे, ग्रामीण भागातील महिलांना आहार व आरोग्य या विषयी योग्य मार्गदर्शन करणे हे देखील अंगणवाडीचे मूलभूत कार्य आहे. या मूलभूत बाबीकडे लक्ष देऊन रा. काँ. शरदचंद्र पवार पक्षाचे गोंदिया जिल्हा कार्याध्यक्ष मिथुन मेश्राम यांनी सडक अर्जुनी तालुक्यातील ग्राम कोयलारी येथे अंगणवाडी केंद्राला भेट देऊन तेथील समस्या विचारात घेऊन ग्रामपंचायत सरपंच रजनीकांत वाल्हे ग्रामसेवक कापगते तसेच बाल कल्याण अधिकारी संजय गणवीर यांच्याशी संपर्क करून नवीन अंगणवाडी करिता इमारती साठी प्रस्ताव तयार करण्यास सांगितले.