- अनिल देशमुखांनी कबूल केलं की त्यांनी 100 करोड रुपये खाल्ले : आ. परीनय फुके
गोंदिया, दि. 25 जुलै : जरांगे पाटील कुणाच्यातरी सांगण्यावरून बोलतात, जरांगे पाटील यांची आधीची लोकप्रियता संपुष्टात आलेली आहे, जरांगे यांनी 288 सिट लडवून दाखवावे त्यांच्या मागे किती लोक आहे, कळून जाणार, असे परिणय फुके म्हणाले, जरांगे पाटील यांची लोकप्रियता घटलेली असून त्यांच्या सोबत मराठा समाज नाही, असे विधानपरिषद सदस्य डॉ. परिणय फुके म्हणाले, जरांगे पटलाना मराठा समाजाला न्याय द्यायचे नसून त्यांना फक्त मराठा ओबीसी वाद निर्माण करायचा आहे असे परिणय फुके पुढे म्हणाले ते 24 जुलै रोजी गोंदिया जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देताना ते बोलत होते.
जरागे पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यवर आरोप करीत म्हणाले की मला जेल मध्ये टाकून मला मारण्याचा प्रयत्न केला आहे, यावर डॉक्टर परिणय फुके म्हणाले की जरांगे पाटील यांचं डोकं फिरले आहे,
जरांगे पाटील कुणाची सुपारी वाजवत आहे हे सगळ्यांना माहीत आहे. हे सर्व जरांगे पाटील बोलत नसून ज्यांनी सुपारी दिली आहे, ते हे वदवून घेत आहे. परिणय फुके पुढे म्हणाले की जरांगे पाटील यांनी संयम ठेवावा.
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा खळबळजनक आरोप, मला देवेंद्र फडणवीस यांनी आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचे विरोध बोलायला लावायचे, यावर परिणय फुके यांची प्रतिक्रिया घेतली असता म्हणाले की याचा अर्थ असा की अनिल देशमुखांनी कबूल केलं की त्यांनी 100 करोड रुपये खाल्ले. आज पर्यंत ते सांगत होते की त्यांनी खाल्ले नाही मात्र त्यांनी आज आपल्या तोडानी कबूल केले की त्यांनी 100 करोड रुपये खाल्ले.