तात्काळ पंचनामे करून शेतक-यांना मदत करा – आ. विनोद अग्रवाल

  • सततधार पावसामुळे निर्माण झालेली पुर परिस्थितीची आ. विनोद अग्रवाल यांनी केली पाहणी.
  • एकही शेतकरी वंचित राहू नये या दृष्टीने काम करण्याचे आ.विनोद अग्रवाल यांनी दिले निर्देश.

प्रतिनिधी/गोंदिया, दि. २५ जुलै : गोंदिया विधानसभा क्षेत्रातील काही गाव नदीकाठी असल्याने त्या भागात गेल्या ३ दिवसापासून सततधार येत असलेल्या पावसामुळे शेतक-यांचे शेतपिकाचे फार मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. तसेच सततधार पावसामुळे मध्यप्रदेश येथील संजय सरोवर, महाराष्ट्रातील पुजारीटोला व कालीसराळ या धरणाचे पाणी सोडल्याने पाण्याची पातळी वाढली असून वाघनदी व वैनगंगा नदीत पाण्याची पातळी सुद्धा वाढलेली आहे. त्यामुळे नदिकाठील परिसरात पुरजन्य परिस्थिती निर्माण झालेली आहे.

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार गोंदिया जिल्हा ऑरेंज अलर्टवर असून सततच्या पावसामुळे सर्व नद्या-नाले तुडुंब भरून वाहत असल्याने लगतच्या शेतक-यांनी रोवलेले धान पिक तसेच इतर पिकाचे नुकसान झाले असून शेतात पाणी साचले आहे. शिवाय अनेक घरांची पडझड झालेली आहे. पाणी शेतामध्ये साचल्याने शेतपिकांचे रोप नष्ट झाले आहे. नुकसान झालेल्या शेतक-यांच्या शेतपिकाचे पंचनामे करणे अत्यंत गरजेचे आहे या करीता आ.विनोद अग्रवाल यांनी पुरग्रस्त क्षेत्राची पाहणी करून नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून माहिती सादर करण्याची सुचना तलाठ्यांना दिली.

पूरग्रस्त भागात कोणीही मदतीसाठी संपर्क साधावा – आ.विनोद अग्रवाल

आ.विनोद अग्रवाल यांनी नदीकाठी असलेले डांगोरली, मरारटोला, कासा, पुजारीटोला, बिरसोला इत्यादि गावांचा दौरा संबधित अधिकारी व कर्मचा-यासह केले असून त्यांना सर्व नुकसान झालेले शेतक-यांचे शेतपिकाचे पंचनामे सादर करा व एकही शेतकरी वंचित राहू नये या दृष्टीने काम करावे असे निर्देश आ. विनोद अग्रवाल यांनी दिले तसेच तेथील परिसरातील नागरिकांना काळजी घेण्याकरीता व तुम्हाला काही मदत हवी असल्यास माझ्याशी संपर्क साधा मी तुम्हाला मदत करायला सदैव तयार आहे असे बोलता नागरिकांना आ.विनोद अग्रवाल यांनी आश्वस्त केले.

दरम्यान आ.विनोद अग्रवाल, तहसीलदार शमशेर पठाण, पंचायत समिती सभापती मुनेश रहांगडाले, ग्रामीण तालुकाध्यक्ष छत्रपाल तुरकर, रामराज खरे महामंत्री जनता की पार्टी (चाबी संगठन), कौशलबाई छत्रपाल तुरकर सरपंच तेढवा संचालक कृषि उत्पन्न बाजार समिती, अनंदा वाढीवा काटी जिप सदस्य, ज्ञानचंद जमईवार काटी जिप प्रमुख, संबधित गावातील तलाठी, देवलाल मात्रे, अनिल मते उपसरपंच, प्रशांत चौहान. बंटी तुरकर, धनीराम अंबुले, तुमन्ने सुरपत खैरवार, रमेश नागफासे, महेश रहांगडाले, अल्पसंख्यक आघाडी तालुकाध्यक्ष आशिफ शेख, रविन्द्र गडपायले, दशरथ पिपरेवार व मोठ्या संख्येने शेतकरी व ग्रामस्थ नागरिक उपस्थित होते.

Leave a Comment

और पढ़ें