अग्रवाल कंपनीच्या कार्यप्रणालीवर प्रश्न चिन्ह ?
गोंदिया, दि. 19 जुलै : जिल्ह्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक : 53 वर सडक अर्जुनी तालुक्यातील ग्राम देवपायली मासुलकशा घाटा जवळ नवीन पुलाचा बांधकाम सुरु आहे. त्यासाठी तात्पुरता सर्व्हिस रोड तयार करण्यात आला. पुल बांधकामाचा कंत्राट अग्रवाल कंपनीला देण्यात आला.
आज 18 जुलै रोजी गोंदिया जिल्हयात जोरदार पावसाने हजेरी लावली यामुळे हा सर्व्हिस रोड वाहुन गेला. त्यामुळे वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. अग्रवाल कंपनीच्या चुकीच्या नियोजनामुळे जाणाऱ्या येणाऱ्या वाहन चालकांना मोठा मनस्ताप सहण करावा लागत आहे. तर सर्व्हिस रोड वाहुन गेल्याने अग्रवाल कंपनीच्या कर्याप्रणालीवर प्रश्न चिन्ह उपस्थीत केलं जात आहे.
Author: Maharashtra Kesari News
Post Views: 2,267