भीषण अपघातात पतीचा मृत्यू तर पत्नी गंभीर जखमी

अर्जुनी मोर, दि. 18 जुलै 2024 : तालुक्यातील शिरोली महागाव जवळ दुचाकी आणि स्कूल बस मध्ये अमोरा समोर धडक झाल्याने भीषण अपघात झाल्याची गंभीर घटना आज दिनांक 18 रोजी सकाळी सव्वा दहा वाजे दरम्यान घडली आहे. अर्जुनी मोरगाव येथे वीज वितरण विभागात कार्यरत असलेले कर्मचारी हरिदास वासुदेव कोहरे वय 45 वर्ष यांचा घटनास्थळी मृत्यू झाला तर त्यांच्यासोबत असणारी त्यांची पत्नी इंदू हरिदास कोहरे वय 40 वर्ष या गंभीर असून ब्रह्मपुरी येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की महागाव येथील रहिवासी असलेले हरिदास कोहरे हे अर्जुनी मोर येतील विद्युत वितरण पारेषण 132 येथे शासकीय सेवेत कार्यरत होते. अर्जुनी मोर येथून स्वगावी महागाव येथे खरीप हंगामातील भात पीक लागवडीकरिता आपल्या शेतात पत्नीसह जात असताना राधिका पेट्रोल पंप शिरोली च्या जवळ स्कूल बस क्रमांक एम एच 35 एजे 3634 व त्यांची दुचाकी एम एच 35 टी 8006 यांच्यात अमोरासमोर धडक झाल्याने कोहरे हे स्कूल बसला धडकले यात दुचाकी चालक हरिदास यांच्या डोक्याला जबर मार लागून त्यांचा जागेवरच मृत्यू झाला

तर त्यांची पत्नी ही गंभीर जखमी झाली घटनेची माहिती मिळताच अर्जुनी मोर. पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक कमलेश सोनटक्के हे आपल्या ताफ्यासह घटनास्थळी पोहोचून जखमी इंदूला ग्रामीण रुग्णालय अर्जुनी मोर. येथे दाखल केले मात्र मार जबर असल्याने ब्रह्मपुरी येथे उपचारासाठी हलविण्यात आले, अपघात एवढा जबरदस्त होता की घटनास्थळावर रक्ताचा सडा पडलेला होता, पोलीस निरीक्षक कमलेश सोनटक्के यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास एपीआय शेंडे करीत आहेत.

 

Leave a Comment

और पढ़ें