- रावणवाड़ी उपकेंद्र येथे आ. विनोद अग्रवाल यांच्या हस्ते 10 MVA ट्रांसफार्मर चे उद्घाटन संपन्न.
- रावणवाड़ी उपकेन्द्र सह आंभोरा, कामठा फीडर अंतर्गत सर्व गावातील नागरिकांना मिळणार लाभ
प्रतिनिधी/गोंदिया, दी. २५ जून : गोंदिया विधानसभा क्षेत्रातंर्गत येणा-या रावणवाड़ी उपकेंद्र मध्ये आ.विनोद अग्रवाल यांच्या हस्ते 10 MVA का ट्रांसफार्मर चे उद्घाटन दि.२४/०६/२०२४ रोजी संपन्न झाले. 3 महिन्यापूर्वीच आमदार विनोद अग्रवाल यांच्या हस्ते या कामाचे भूमिपूजन संपन्न झाले होते व त्यांनी त्या दरम्यान शेतक-यांना तसेच नागरिकांना आश्वस्त केले होते कि नागरिकांना ३ महिनेच्या आत ह्या समस्यापासून सुटका मिळणार आहे.व ३ महिन्यात आ.विनोद यांनी जे बोलले होते ते करून दाखवले त्याबद्दल परिसरातील सर्व शेतकरी व नागरिकांनी आ.विनोद अग्रवाल यांचे आभार व्यक्त केले आहे. या ट्रांसफार्मरमुळे क्षेत्रातील नागरिकांना व शेतक-यांना विजेच्या समस्यांपासून सुटका मिळणार आहे तसेच वारंवार वीजपुरवठा खंडित होण्याच्या आणि कमी व्होल्टेजच्या समस्येपासून आपली सुटका होईल आणि नागरिकांना 24 तास अखंड वीज मिळेल. रावणवाड़ी उपकेंद्र ला सलंग्न असलेले अंभोरा व कामठा केंद्र तसेच रावणवाडी उपकेंद्रांतर्गत येणाऱ्या सावरी, नागरा, अंभोरा, टेमणी, बरबसपुरा, चुलोद, दत्तोरा, आसोली असे एकून १६ गावातील नागरिकांना यापुढे विजेच्या समस्येला सामोरे जावे लागणार नाही.
या दरम्यान आ.विनोद अग्रवाल, कृषि उत्पन्न बाजार समिती चे सभापती भाउराव उके, पंचायत समितिचे सभापती मुनेश रहांगडाले, जनता की पार्टी तालुकाध्यक्ष छत्रपाल तुरकर, मुख्य अभियंता पुष्पा चौहान, अधीक्षक अभियंता रामराव राठौड़, कार्यकारी अभियंता आनंद जैन, शैलेश कांबडे कार्यकारी अभियंता प्रविभाग, राजीव रामटेके कार्यकारी अभियंता गोंदिया परिमंडळ, श्री वैभव नरखेड, अति.कार्यकारी अभियंता गोंदिया विभाग, गजानन देव्हारे उपकार्यकारी अभियंता गोंदिया ग्रामीण विभाग, किसान आघाडी जिलाध्यक्ष मोहन गौतम, कृषि उत्पन्न बाजार समीती संचालक चेतन बहेकार, कामठा जिप प्रमुख पृथ्वीराजसिंह नागपुरे महिला तालुकाध्यक्ष जनता की पार्टी चैतालीसिंह नागपुरे, संचालिका कौशलबाई छत्रपाल तुरकर, पांजरा जिप प्रमुख लखन हरिनखेड़े, जिला उपाध्यक्ष जनता की पार्टी सुजीत येवले, महामंत्री रामराज खरे, ज्ञानचंद जमईवार, रेखाबाई लिल्हारे, प.स.समिती सदस्य शशीबाई राजू कटरे, प.स.सदस्य, जितेश्वरीताई रहांगडाले, प.स.सदस्य मंजूताई डोंगरे, शिलाताई वासनिक सरपंच रावणवाड़ी, तालुका युवा मोर्चा अध्यक्ष शेखर शहारे, शालिकराम हरिनखेड़े, भरत बिसेन, महेश पगरवार, महेश चौधरी, ललित तावाडे सरपंच खातिया, देवानंद महारवाड़े, जियालाल बोपचे, युवराज लिल्हारे, दिलीपसिंह मुन्डेले, रविंद्र गडपायले, सूर्यमणि रामटेके, इत्यादी कार्यकर्त्ता तथा पदाधिकारी उपस्थित थे.